(रत्नागिरी)
रोटरी क्लब ऑफ रत्नागिरी तर्फे पाथवेज टू सक्सेस अंतर्गत करिअर मार्गदर्शन सेमिनार रा.भा शिर्के हायस्कूल व अ.के देसाई हायस्कूल येथे आयोजित करण्यात आला होता. अनुभवी चार्टर्ड अकाउंटंट रोटे. मोनिका बलदावा यांनी शिबिरातील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या शिबिरामधे विद्यार्थ्यांनची सायकोमेट्रिक टेस्ट देखील करण्यात आली व त्यानुसार प्रत्येक विद्यार्थ्यांना करिअर बाबत वयक्तिक रिपोर्ट देण्यात येणार असून, सदरची टेस्ट रत्नागिरीमध्ये उपलब्ध नसून बाहेर यासाठी ४००० ते ५००० शुल्क आकारले जाते, मात्र रोटरी क्लब तर्फे नाममात्र रजिस्ट्रेशन फी घेऊन सायकोमेट्रिक टेस्ट करण्यात आली तसेच गरीब व गरजू मुलांचा खर्च रोटरी क्लब ऑफ रत्नागिरीने उचलला,
करिअर मार्गदर्शन सेमिनार व सायकोमेट्रिक टेस्टचा शिबीराचा रत्नागिरी परिसर तसेच ग्रामीण भागातील मुलांना मोठा फायदा झाला. करिअरची निवड कशी करावी व कोणते पर्याय उपलब्ध आहेत, त्यांना असलेला योग्य पर्याय कोणते आहेत या बाबत सखोल मार्गदर्शन करण्यात आले.करिअर मार्गदर्शन सेमिनार प्रसंगी रोटरी क्लबचे अध्यक्ष श्री.रूपेश पेडणेकर, सचिव ॲड.मनिष नलावडे, इवेंट चेअरपरसन रोटे.वेदा मुकादम, रोटे.विनायक हातखंबकर, रोटे.माधुरी कळंबटे, रोटे.नीता शिंदे, रोटे.सचिन मुकादम तसेच शाळेचे मुख्याध्यापक श्री.के.डी कांबळे व श्रीमती. प्रज्ञा दळी, शिक्षक वर्ग व मोठा संख्येने पालक वर्ग व विद्यार्थी उपस्थित होते.