(रत्नागिरी / वैभव पवार)
कुणबी समाजोन्नती संघ, मुंबई अंतर्गत विद्यार्थी गुणगौरव व कुणबी समाजोन्नती संघ शाखा राजापूर यांच्या वतीने आयोजित सन्मान कार्यक्रमात प्रसिद्ध समाजप्रबोधक व्याख्याते व करिअर मार्गदर्शक माधव विश्वनाथ अंकलगे सर यांनी विद्यार्थ्यांनी आपल्या आवडीनुसार क्षेत्राची निवड करताना त्यानुरूप नियोजन, कष्ट, इच्छाशक्ती यांच्या बळावर यशाला गवसणी घालावी असे आवाहन करतानाच अनेक नवनवीन क्षेत्राची माहिती दिली. त्यासाठी आवश्यक पात्रता, उपलब्ध संधी आणि भविष्याचे पर्याय यावर मार्गदर्शन केले.
यावेळी मंचावर कुणबी समाजोन्नती संघ शाखा राजापूर मुंबईचे अध्यक्ष शिवाजी तेरवनकर, सचिव अनिल भोवड, ग्रामीण समिती राजापूरचे अध्यक्ष दीपक नागले, सचिव चंद्रकांत जानस्कर, राजापूर तालुका कुणबी पतपेढीचे अध्यक्ष प्रकाश मांडवकर यांच्यासह विविध समित्यांचे प्रमुख, पतसंस्था संचालक, शिक्षक, विद्यार्थी आणि पालक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.