(रत्नागिरी)
रत्नागिरी जिल्ह्यातील पाच विधानसभा मतदारसंघांत एकूण ३१ उमेदवारांचे अर्ज दाखल झाले आहेत. या उमेदवारांनी आपल्या प्रतिज्ञापत्रात संपत्ती जाहीर केली आहे. त्यानुसार प्रमुख पक्षांच्या उमेदवारांची संपत्ती कोटीच्या घरात आहे.
दापोलीत शिंदेसेनेचे उमेदवार योगेश कदम यांची सर्वाधिक ३२.६८ कोटींची मालमत्ता असून गुहागरमध्ये उद्धवसेनेचे भास्कर जाधवही ३२.३० कोटींचे मालक आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातील पाचही विधानसभा मतदारसंघापैकी चार मतदरसंघात उद्धवसेना तर एका मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) यांच्यात लढत आहे. रत्नागिरीतील शिंदेसेनेचे उमेदवार पालकमंत्री उदय सामंत यांची ४,५२ कोटी, बाळ माने ४.११ कोटी, किरण सामंत २९.७७ कोटी, राजन साळवी १.३० कोटी, राजेश बेंडल ३.३० कोटी, प्रशांत यादव ६.६५ कोटी, शेखर निकम यांची ५.४३ कोटींची मालमत्ता आहे. दापोलीतील उद्धवसेनेचे संजय कदम यांची मात्र मालमत्ता ५८.९६ लाख इतकी आहे.