( रत्नागिरी /प्रतिनिधी )
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल संसदेत अपशब्द वापरून अपमान केला होता. या घटनेचा भारतभर तीव्र निषेध केला जात आहे. यात बहुजन समाज पार्टीकडून ही देशभरात निर्देशने आंदोलन करून निषेध नोंदवला जाणार आहे.
या पार्श्वभूमीवर रत्नागिरीत देखील परभणी येथील पोलिस प्रशासनाने केलेल्या आंबेडकरी आंदोलकांवर अत्याचाराबाबत आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांबाबत केलेल्या वक्तव्याविरोधात बहुजन समाज पार्टीच्या वतीने रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मंगळवारी, दिनांक 24 डिसेंबर 2024 रोजी सकाळी दहा वाजता धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.
या आंदोलनात सर्व बसपा कार्यकर्ते, हितचिंतक यांनी तसेच फुले शाहू आंबेडकर चळवळीतील सर्व संघटनांनी मनुवादी व्यवस्थेविरोधात एकत्र येऊन या घटनांचा धिक्कार करण्यासाठी रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलनात सहभागी व्हावे असे आवाहन प्रदेश सचिव राजेंद्र आयरे यांनी केले आहे.