(साखरपा / दीपक कांबळे)
साखरपा दाभोळे परिसरात बीएसएनएल कंपनीची रेंज मिळत नसल्याने ग्राहक वर्गात कमालीची नाराजी व्यक्त होत आहे. सर्वाधिक ग्राहक असलेल्या बीएसएनएल कंपनीकडून अँड्रॉइड मोबाईल व्यतिरिक्त अन्य हँडसेट ला रेंज मिळत नाही तरी अँड्रॉइड मोबाईल प्रमाणे अन्य हँडसेटलाही रेंज मिळून सर्वच ग्राहक वर्गाला कंपनीचे सेवा उपलब्ध होईल अशी व्यवस्था व्हावी असे ग्राहक वर्गातून मागणी होत आहे.
देवरुख लांजा रत्नागिरी आदी ठिकाणी सर्वच हँडसेट ना रेंज उपलब्ध असते मात्र साखरपा दाभोळे परिसरात केवळ अँड्रॉइड मोबाईलला रेंज मिळत आहे ग्राहकांच्या समस्येचे तात्काळ निराकरण करण्यात यावे. तसेच अन्य खाजगी कंपन्याने रिचार्ज मध्ये भरमसाठ वाढ केल्याने बीएसएनएल कंपनीचे पूर्वीचे तमाम ग्राहक आता पूर्वस्थितीत बीएसएनएलकडे वळत आहे याचा विचार करून आपल्या सर्वच ग्राहकांना त्यांच्या कोणत्याही कंपन्यांच्या हँडसेटला रेंज उपलब्ध करून देण्याची विनंती केली जात आहे.