(चिपळूण)
भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोदी सरकारच्या योजना घराघरात जाऊन पोहोचवा. ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेचा प्रत्येक महिलेला लाभ मिळेल. या दृष्टीने प्रयत्न करावेत, असे आवाहन सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांनी केले. ते चिपळूण येथे उत्तर रत्नागिरी भाजपा पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या आढावा बैठकीप्रसंगी केले.
ही बैठक गुरुवारी शिक्षक पतपेढीच्या सभागृहात झाली. यावेळी कोकण पदवीधर मतदार संघाचे नवनिर्वाचित आमदार निरंजन डावखरे यांचा उत्तर रत्नागिरीतर्फे जाहीर सत्कार करण्यात आला. महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस विक्रांत पाटील प्रदेश उपाध्यक्ष अतुल काळसेकर, कोकण संघटनमंत्री शैलेंद्र दळवी, माजी आमदार डॉ. विनय नातू, माजी आमदार सूर्यकांत दळवी, प्रदेश कार्यकारिणी सदस्य प्रशांत शिरगावकर, भाजपा महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्षा चित्रा चव्हाण, जिल्हा महिला मोर्चा जिल्हाध्यक्षा सुरेखा खेराडे, तालुकाध्यक्ष वसंत ताम्हणकर, विजय चितळे, आशिष खातू उपस्थित होते.
महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष विक्रांत पाटील यांनी आपल्या मार्गदर्शनात संघटनात्मक अनेक मुद्दे मांडले. यावेळी उत्तर रत्नागिरीतील सर्व मंडळ अध्यक्ष, जिल्हा पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. ओबीसी मोर्चा जिल्हाध्यक्ष संतोष जैतापकर यांच्या मार्गदर्शनाखाली गुहागरमधील काही कार्यकर्त्यांनी भाजपामध्ये जाहीर प्रवेश केला.