(चिपळूण)
रोटरी क्लब चिपळूण, क्युरियस माईंड, गोवा व डी. बी. जे. कॉलेज, चिपळूण तर्फे आयोजित संकल्पना 3.0 रोबोटिक स्पर्धा अतिशय उत्साहात आणि यशस्वीरित्या पार पडली. या स्पर्धेत विज्ञान प्रश्नमंजुषा, विज्ञान प्रदर्शन, रोबोट्स कन्स्ट्रक्शन, पूल बांधणी स्पर्धा आणि रोबो शर्यत अशा स्पर्धा दोन वयोगटांमधील विद्यार्थ्यांनी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत रोबोट तयार केले आणि विविध आव्हानात्मकतास पूर्ण करून आपले कौशल्य सिद्ध केले.
या स्पर्धेमध्ये ज्या विद्यार्थ्यांना रोबोटिक्स बद्दल काहीही ज्ञान नव्हते, अशा विद्यार्थ्यांनी आपल्या कौशल्येने विविध प्रकारचे रोबोट्स, रोबोट शर्यत आणि पूल बांधणी स्पर्धेमध्ये अग्रेसर पुढाकार घेऊन स्पर्धेमध्ये भाग घेतला. या स्पर्धेचे महत्त्व म्हणजे रोबोटिक्स बद्दल ज्ञान व त्याचा आत्ताच्या युगामध्ये दैनंदिन वापरामध्ये कसा करता येईल? याचे प्रात्यक्षिक करून दाखविले जेणेकरून याचा फायदा विद्यार्थ्यांना होऊन नव नवीन टेक्नॉलॉजी मध्ये रोबोटिक्स चा वापर कसा होईल? याकडे भर दिला.
या कार्यक्रमाची प्रस्तावना सूत्रसंचालन प्रा. श्री. सुनील भादुले यांनी केले, पाहुण्यांची ओळख प्राध्यापिका सौ. सोनाली वराडे-खर्चे यांनी केले. या कार्यक्रमाचा उद्देश काय? या कार्यक्रमाची गरज काय? कशासाठी आपण हा कार्यक्रम राबविला? याबद्दल थोडक्यात माहिती रोटरी क्लबचे अध्यक्ष अविनाश पालशेतकर यांनी सांगितले. स्पर्धेत 25 शाळेतील 415 विद्यार्थी सहभाग घेतला. ज्यात एसीबी इंटरनॅशनल स्कूल चिपळूण, रोटरी इंग्लिश मीडियम स्कूल, खेड, एसपीएम हायस्कूल परशुराम इत्यादी विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरी केली.
या स्पर्धेसाठी फ्लाईट लेफ्टनंट श्री. मनोज जमसंडेकर व श्री. निनाद निलेश चव्हाण स्कॉन कंपनीचे संचालक, प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांच्या अभिनव कल्पनांना दात देत त्यांचे कौतुक केले. स्पर्धेचे आयोजन रोटरी क्लब चिपळूण तर्फे करण्यात आले होते आणि सर्जनशीलता विकसित करण्याची संधी मिळाली. प्रमुख पाहुण्यांनी “मुलांना शिकवताना तुम्ही काय शिकला? ते शिकवण्यापेक्षा त्यांना काय शिकायचं आहे ते शिकवण गरजेच आहे” हे ब्रीदवाक्य रवींद्रनाथ टागोर यांचं आपल्या मनोगता मधून त्यांनी व्यक्त केले. मुलांनी काळाच्या गरजेप्रमाणे बदलणे गरजेचे आहे व नव नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून आत्ताच्या युगामध्ये जगणं गरजेचे आहे. निनाद चव्हाण आपल्या भाषणांमधून विद्यार्थ्यांना शून्यातून कसे उभे राहिलो तसेच त्यांनी आपल्या कंपनीबद्दल त्यांच्या वडिलांची म्हणजेच श्री. निलेश चव्हाण यांची कारकीर्द सांगितली व आपण कसं उत्तम शिक्षण घेऊन कंपनीला फायदा कसा होईल? याकडे त्यांनी लक्ष वेधले. तसेच विद्यार्थ्यांनी आपल्या जीवनामध्ये खेळ हा महत्त्वाचा असून नवीन तंत्रज्ञानाचा वापर करावा व रोबोटिक सारखी ही कार्यशाळा व स्पर्धा रोटरी क्लब ने आयोजित केली त्याबद्दल त्यांनी रोटरी क्लबचे खूप आभार मानले.
आयोजकाने पुढील वर्षी अधिक व्यापक स्वरूपात ही स्पर्धा घेण्याचा संकल्प केला आहे. या स्पर्धे खालील बक्षिसे देण्यात आली 1. विज्ञान प्रदर्शन– अ गट- प्रथम – दलवाई हायस्कूल, मिरजोळी, द्वितीय – युनायटेड धोंडीरामशेठ दाभोळकर इंग्लिश मीडियम स्कूल, खेर्डी, तृतीय – नॅशनल इंग्लिश मीडियम स्कूल, मिरजोळी, ब गट – प्रथम -एसीबी इंटरनॅशनल स्कूल, चिपळूण, द्वितीय -युनायटेड इंग्लिश स्कूल, चिपळूण, तृतीय – सुरेश दामोदर गद्रे इंग्लिश मीडियम स्कूल 2. रोबो कंस्ट्रक्शन अ गट – प्रथम -रोटरी इंग्लिश मीडियम स्कूल, खेड, द्वितीय -सुरेश दामोदर गद्रे इंग्लिश हायस्कूल चिपळूण, तृतीय -युनायटेड इंग्लिश स्कूल, चिपळूण, ब गट प्रथम- झेड पी स्कूल टेरव 1, द्वितीय -एसीबी इंटरनॅशनल स्कूल, चिपळूण, तृतीय -युनायटेड इंग्लिश स्कूल, चिपळूण, 3.पूल बांधणी स्पर्धा अ गट प्रथम – परांजपे मोतीवाले हायस्कूल, चिपळूण, द्वितीय -नॅशनल इंग्लिश मीडियम स्कूल, मिरजोळी, तृतीय -एसपीएम इंग्लिश मीडियम स्कूल, परशुराम, ब गट प्रथम -परांजपे मोतीवाले हायस्कूल, चिपळूण, द्वितीय – एसीबी इंटरनॅशनल स्कूल, चिपळूण, तृतीय -रोटरी इंग्लिश मीडियम स्कूल, खेड, 4. विज्ञान प्रश्नमंजुषा अ गट प्रथम -एसीबी इंटरनॅशनल स्कूल, चिपळूण, द्वितीय- मेरी माता स्कूल, चिपळूण, तृतीय- युनायटेड इंग्लिश स्कूल, चिपळूण ब गट प्रथम- रोटरी इंग्लिश मीडियम स्कूल, खेड, द्वितीय – एसीबी इंटरनॅशनल स्कूल, चिपळूण, तृतीय -एस पी एम इंग्लिश मीडियम स्कूल, परशुराम, 5.रोबो शर्यत अ गट प्रथम -एसीबी इंटरनॅशनल स्कूल, चिपळूण, द्वितीय -रोटरी इंग्लिश मीडियम स्कूल, खेड, तृतीय -मेरी माता स्कूल, चिपळूण, ब गट प्रथम- एसीबी इंटरनॅशनल स्कूल, चिपळूण, द्वितीय – न्यू इंग्लिश स्कूल, पोफळी, तृतीय -रोटरी इंग्लिश मीडियम स्कूल, खेड.
या कार्यक्रमाचे शिक्षक व विद्यार्थ्यांकडून भरभरून कौतुक करण्यात आले. असा कार्यक्रम रत्नागिरी जिल्ह्यामध्ये कधीच झाला नव्हता त्याबद्दल रोटरी क्लब चिपळूणचे आभार मानण्यात आले. असाच दुसरा कार्यक्रम नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानाचा वापर करून लवकरात लवकर घेऊन येऊ अशी ग्वाही रोटरी क्लब अध्यक्ष अविनाश पालशेतकर यांनी केले. या कार्यक्रमासाठी नव कोकण एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन मंगेशजी तांबे व त्यांचे सर्व पदाधिकाऱ्यांनी खूप सहाय्य केले, डी बी जे कॉलेजचे प्राचार्य डॉ. माधव बापट यांनी खूप सहकार्य केले. या कार्यक्रमाला सीनियर कॉलेजचे उपप्राचार्य डॉ. श्री. आर. एम. मोरे, रजिस्टर अनिल कलकुटकी, उपप्राचार्य एन. एस. तळप, पर्यवेक्षिका सौ. स्नेहल कुलकर्णी, रोटरी क्लब तर्फे रोहन देवकर, विनोद घुमरे, मंगेश माटे, प्रकाश लटके, स्वप्निल चिले, राजेश ओतारी, नितीन देवळेकर उपस्थित होते.
या कार्यक्रमाच्या भोजनाची व्यवस्था विनती ऑरगॅनिक लिमिटेड या कंपनीने केली. या कार्यक्रमाचा खारीचा वाटा म्हणून अक्षर साहित्य, चिपळूण, प्रशांत बुक डेपो चिपळूण, गजानन बुक डेपो व नवचैतन्य बुक डेपो चिपळूण यांनी उचलला. कौतुकाची बाब म्हणजे नव्याने स्थापन झालेले एस पी एम इंटरॅक्ट क्लब, परांजपे मोतीवाले हायस्कूल इंटरॅक क्लब व युनायटेड इंग्लिश स्कूल इंटरॅक क्लब यांनी देखील या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.