( पुणे )
पुणे जिल्ह्यातील बावधन जवळ हेलिकॉप्टर कोसळून तिघांचा मृत्यू झाला आहे. धुक्यामुळे ही दुर्घटना घडली आहे. या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी दोन रुग्णवाहिका आणि चार अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल झाल्या आहेत. ऑगस्टा १०९ असे बावधन जवळ दुर्घटनाग्रस्त झालेल्या हेलिकॉप्टरचे नाव आहे.
या अपघातात दोन पायलट आणि एका विमान देखभाल अभियंत्याचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे. या हेलिकॉप्टरमध्ये प्रवासी नव्हते. हेलिकॉप्टरमध्ये २ पायलट आणि एक अभियंता होता. सर्व तीन क्रू मेंबर्सची यात जीवितहानी झाल्याची प्राथमिक माहिती आहे. या दुर्घटनाग्रस्त हेलिकॉप्टरमध्ये कॅप्टन पिल्लई आणि कॅप्टन परमजीत हे पायलट होते. ही प्राथमिक माहिती असून त्याची पुष्टी केली जात आहे,” असे नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाच्या (DGCA) अधिकाऱ्याने सांगितले.