(गुहागर)
विधानसभा निवडणुक कालावधीत वंचीतचे जिल्हाध्यक्ष विकास उर्फ अण्णा पाटील यांच्यावर झालेल्या हल्ल्यातील 2 आरोपीना पकडण्यात गुहागर पोलिसांना यश आले असून आरोपी अनुप नारायण जाधव बदलापूर पश्चिम व कुणाल किसन जुगे अंबरनाथ पश्चिम यांना भा. न्या.सं.कलम 118(1),352,324(4),3(5) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार सदर 2 आरोपी यांचा विकास जाधव यांच्यावर झालेल्या हल्ल्यात सक्रिय सहभाग निष्पन्न झाल्याने दोन्ही आरोपींना ताब्यात घेऊन अटक करण्यात आली आहे. सदर गुन्ह्यात अन्य 5 आरोपींचा सहभाग असल्याचे निष्पन्न होत असून त्यांचा कसून शोध सुरू आहे. दरम्यान आरोपींना गुहागर न्यायालयात हजर केले असता त्यांना 12 डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
सदर गुन्ह्याचा तपास गुहागर पोलीस ठाणे करत असून सदर गुन्ह्याचे तपासात मा. पोलीस अधीक्षक सो .रत्नागिरी श्री. धनंजय कुलकर्णी सर, मा. अप्पर पोलीस अधीक्षक सो. रत्नागिरी श्रीम. जयश्री गायकवाड, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी चिपळूण श्री. राजेंद्र राजमाने तसेच स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा रत्नागिरी चे पोनि श्री. नितीन ढेरे व स्टाफ यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभलेले आहे. सदर गुन्ह्याचा तपास गुहागर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक श्री. भोपळे करत आहे तसेच त्यांना मदत पोलीस निरीक्षक सचिन सावंत व सहकारी करीत आहेत.