(देवरूख / सुरेश सप्रे)
ग्रामसंघ सांगवे व शालेय व्यवस्थापन समिती जि. प. शाळा सांगवे यांच्या संयुक्त विद्यमाने पूर्ण प्राथमिक केंद्रशाळा सांगवे येथे शाळेतील सर्व विद्यार्थी व गावातील महिला यांचा रक्तगट तपासणी व राष्ट्रीय कीटकजन्य रोग नियंत्रण मार्गदर्शन असा संयुक्त कार्यक्रम संपन्न झाला.
जुगाई लॅब चे मालक देविदास जाधव यांनी मोलाचे सहकार्य करून विद्यार्थी व महिला यांचे रक्तगट तपासले. यावेळी ग्रामसंघ सांगवेच्या अध्यक्षा सौ. लताताई शेलार, आशा सेविका श्रीम. सानिका सावंत, आरोग्य सेवक प्रकाश झोरे, शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा सौ. सानिका चव्हाण तसेच सांगवे शाळेचे मुख्याध्यापक प्रवीण पवार सहकारी शिक्षक सुभाष जाधव, श्रीम. मनीषा कोळी व अमिता शिंदे आदी उपस्थित होते.
यावेळी शाळेतील 100% मुलांचे तसेच गरजू महिला भगिनी यांचे रक्तगट तपासण्यात आले. यानंतर झोरे यांनी कीटकजन्य रोग नियंत्रण याबाबत मार्गदर्शन केले. याच कार्यक्रमाचे औचित्य साधून स्वातंत्र्यदिनाची पूर्वतयारी म्हणून सांगवे शाळेचा परिसर स्वच्छ करण्यासाठी श्रमदान केले. यासाठी गावातील ग्रामस्थ व सर्व पालक यांनी श्रमदान करून शाळेला मोलाचे सहकार्य केले. यावेळी शाळेच्या वतीने सर्वांचे आभार व्यक्त करण्यात आले.