(गुहागर)
भारतीय जनता पार्टी उत्तर रत्नागिरी जिल्हा कार्यकारणी सभेत भाजपा ओबीसी मोर्चा उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष श्री. संतोष जैतापकर यांच्या कार्यप्रणालीने प्रेरीत होऊन शिवसेना उबाठा गटातील गुहागर विधानसभा मतदार संघातील शेकडो कार्यकर्ते यांनी मंत्री रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला.
या प्रवेश केलेल्यांमध्ये शिरगाव ग्रामपंचायत चिपळूण माजी सरपंच सुलभा मुंडेकर व त्याचे कार्यकर्ते, पाचगणी नायनाक वाडी माजी सरपंच श्री. आनंद नायनाक व कार्यकर्ते, धामणदेवी बेलवाडी ग्रामपंचायत सदस्य श्री सुनील मेणे व कार्यकर्ते, गुहागर मधील सामाजिक कार्यकर्ते श्री आदेश जाधव व कापसाळ गाव बुद्धवाडी युवा नेतृत्व आकाश पवार व वाडीतील नागरिक यांचा समावेश होता.
यावेळी व्यासपीठावर आमदार श्री निरंजन डावखरे, प्रदेश सरचिटणीस श्री विक्रांत पाटील, श्री अतुल काळसेकर, श्री.शैलेंद्र दळवी, श्री विनय नातू, श्री सूर्यकांत दळवी, श्री प्रशांत शिरगांवकर व पदाधिकारी उपस्थित होते.
यापूर्वीही भाजपा ओबीसी मोर्चा चे उत्तर रत्नागिरीचे जिल्हाध्यक्ष संतोष जैतापकर यांनी “शतप्रतिशत भाजपा” या स्लोगन प्रमाणे हजारो लोकांचे प्रवेश करून घेतले आहेत. या प्रवेशाने विधानसभेला गुहागर मतदारसंघात भाजपचे पारडे चांगले जड झाले असून विरोधकांना मतजोडणी करण्यासाठी चांगलीच दमछाक होणार आहे.