(संगमेश्वर / मकरंद सुर्वे)
“एकीकडे लोकशाही वाचवण्यासाठी लढत असल्याचे चित्र उभे करायचे, ४०० पार झाल्यानंतर संविधानात बदल करणार असल्याचा समाजात संभ्रम निर्माण करून निवडणुका लढायच्या, हे तंत्र वापरणाऱ्या काँग्रेस आणि त्यांच्या सहयोगी घटक पक्षांनी कधीकाळी देशावर आणीबाणी लादून देशातील लोकशाहीला नख लावले होते, महान भारतीय संविधानाची पायमल्ली केली होती. याचीच आठवण, त्या घटनेचा निषेध आणि त्याकाळी सरकारला धारेवर धरण्यासाठी सर्वस्व पणाला लावणाऱ्या समाजधुरीणांचा सन्मान करण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश भाजपाच्या नेतृत्त्वात जिल्हाध्यक्ष श्री. राजेशजी सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली संगमेश्वर (उ.) मंडलातील भाजपाचे तमाम कार्यकर्ते, पदाधिकारी व हितचिंतक एकत्र येऊन ‘आणीबाणी काळा दिवस’ पाळत आहोत.” असे तालुकाध्यक्ष श्री. विनोद म्हस्के यांनी सांगितले.
माभळे, संगमेश्वर येथील ज्येष्ठ कार्यकर्ते श्री. प्रभाकर नारायण भिडे यांनी याच कालावधीत तुरुंगवास भोगला होता. जवळपास १४ महिने तुरुंगात खितपत पडलेल्या भिडे यांचे अटकेपूर्वी ६ महिने अगोदर लग्न झाले होते. मात्र इंदिरा गांधी यांचे सरकार व पोलीस यांनी भिडे व त्यांच्यासारख्या असंख्य निरपराध लोकांना कोणतीही दयामाया न दाखवता तुरुंगात डांबून ठेवले. याबाबत श्री. भिडे माहिती देत असताना उपस्थित कार्यकर्त्यांच्या डोळ्यांत अश्रू तरळले.
श्री. प्रभाकर भिडे व सौ. प्रज्ञा भिडे यांचा त्याग आदर्शवत असल्याने भाजपाच्या नव्या दमाच्या कार्यकर्त्यांनी त्यांचा यथोचित सन्मान केला. यावेळी काँग्रेसच्या संविधानप्रेम व लोकशाहीबाबतच्या मुखवट्याविषयी प्रबोधन करण्यात आले. आजच्या पिढीने काँग्रेसचे काळे कारनामे पाहिले, अनुभवले नसल्याने त्यांना मा. मोदीजींविरोधी काँग्रेसची भूमिका योग्य वाटत आहे. मात्र आजही काँग्रेसप्रणित राज्यांतील नागरिकांची स्थिती अत्यंत दुसःह असलेली पहायला मिळते. असे मान्यवरांनी आपल्या मनोगतातून सांगितले.
या आणीबाणीविरोधी निषेध आंदोलनाचे संयोजन जिल्हा संयोजक प्रशांत डिंगणकर, सहसंयोजिका सौ. नुपूरा मुळ्ये, तालुकाध्यक्ष विनोद म्हस्के यांनी केले. यावेळी सरचिटणीस मिथुन निकम, विधानसभा युवा मोर्चा संयोजक अविनाश गुरव, भाजयुमो तालुकाध्यक्ष स्वप्नील सुर्वे, उपाध्यक्ष राजेश आंबेकर, मंगेश साळवी, सौ. प्रज्ञा भिडे, सौ. मानसी भिडे, प्रसाद भिडे, अनिल भिडे, मुग्धा भिडे, दिपा भानुशाली, ग्रा. पं. पाचांबे सरपंच संदेश घाडगे, ग्रा. पं. अणदेरी सरपंच दिनेश मालप, शक्तिकेंद्र प्रमुख संतोष गुरव आदी मान्यवर उपस्थित होते.