(चिपळूण)
आगामी विधानसभा निवडणुकीत चिपळूण- संगमेश्वर विधानसभेचा आमदार हा भाजपाचाच असावा, अशी मागणी करीत जिल्हा परिषद गट निहाय मतांची मांडणी तालुकाध्यक्ष वसंत ताम्हणकर यांनी केली असून या मतदारसंघावर दावा ठोकला आहे.
भाजपा चिपळूण पूर्व तालुक्याची विस्तारित तालुका कार्यकारिणीची मिटिंग चिपळूण तालुक्यातील पेढांबे येथील पुष्कर हॉल येथे संपन्न झाली. यावेळी भाजपा दक्षिण रत्नागिरी जिल्हा अध्यक्ष राजेश सावंत आणि चिपळूण- संगमेश्वर विधानसभा प्रमुख प्रमोद अधटराव यांची प्रमुख उपस्थिती होती.
चिपळूण – संगमेश्वर विधानसभा प्रमुख प्रमोद अधटराव यांनी कार्यकर्त्यांना संघटनात्मक बांधणीबाबत मार्गदर्शन केले. तर आगामी विधानसभा निवडणुकांमध्ये आपले बळ अधिक वाढविण्याकरिता बूथ सक्षमीकरणावरती सर्वच पदाधिकारी कार्यकर्त्यांनी तसेच बूथ अध्यक्षांनी जास्तीत जास्त भर देऊन काम करावे असा सल्ला देत जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांनी यावेळी कार्यकर्त्यांचे कान टोचले.
यावेळी जिल्हा सरचिटणीस अमित केतकर, जिल्हा उपाध्यक्ष रामदास राणे, जिल्हा उपाध्यक्ष चंद्रशेखर निमकर, जिल्हा उपाध्यक्ष स्नेहा मेस्त्री, महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष चित्रा चव्हाण, महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष सुरेखा खेराडे, संगमेश्वर तालुका अध्यक्ष विनोद म्हस्के, रुपेश कदम, चिपळूण माजी तालुकाध्यक्ष सतीश मोरे, जिल्हा चिटणीस विनोद भुरण, विनोद भॊबस्कर, सचिन शिंदे, बेटी बचाव बेटी पढाव कोकण विभाग सहसंयोजिका रसिका देवळेकर, माजी नगरसेवक विजय चितळे, अनुसूचित जाती मोर्चा जिल्हाध्यक्ष अनिल सावर्डेकर, सहकार सेल जिल्हा संयोजक रत्नदीप देवळेकर, जिल्हा विशेष निमंत्रित सदस्य विनोद सुर्वे, वैशाली निमकर, ओबीसी मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष मधुकर फके, तालुका उपाध्यक्ष संदीप सुखदरे आदी उपस्थित होते. सुत्रसंचालन युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस मंदार कदम यांनी केले.