( संगमेश्वर / प्रतिनिधी )
सह्याद्री कला महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या कलाकृती पाहून मन आनंदी बनले. येथील विद्यार्थी घेत असलेली मेहनत पाहता, त्यांचे कौतुक करावे तेवढे थोडेच. येथील केवळ चित्रेच नव्हे, तर सर्व शिल्प देखील बोलकी आहेत. राज्य कला प्रदर्शनात मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांची निवड होणे, हेच या कला महाविद्यालयाचे खरे यश आहे असे प्रतिपादन कोल्हापूर येथील चित्रकार बबन माने यांनी केले. सह्याद्री कला महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या कलाकृतींच्या प्रदर्शनाचे उदघाटन आज १५ जानेवारी रोजी संपन्न झाले. यावेळी आयोजित कार्यक्रमात चित्रकार माने हे बोलत होते.
याप्रसंगी उद्घाटक म्हणून उद्योजक प्रशांत गोविंदरावजी निकम यांनी भूषविले. तसेच प्रमुख पाहुणे म्हणून चित्रकार बबन माने, चित्रकार विजय उपाध्ये ,शिल्पकार संदीप ताम्हणकर, ज्येष्ठ चित्रकार शिल्पकार प्रकाश अर्जुन राजेशिर्के, अनिरुद्ध निकम, ऑलिव मर्चंड हे उपस्थित होते.यावेळी बोलताना माने पुढे म्हणाले की, बबन माने -२००४ साली मी आलो होतो त्यानंतर आता हे कलामहाविद्यालय पाहून मी थक्कच झालो. शहरी विद्यार्थ्यां प्रमाणेच हे देखील विद्यार्थी कलेच्या दृष्टीने पुढारलेले आहेत.
शिक्षण महर्षी गोविंदराव निकम कलाजीवन गौरव पुरस्कार प्राप्त सत्कार मूर्ती सलीम मणेरी यावेळी बोलताना म्हणाले की, माझा सन्मान होणे मी भाग्यच समजतो. याचे सर्व श्रेय घरच्या मंडळीना देतो. मुलांना सोप्या पद्धतीने शिकवणे. प्रात्यक्षिकदाखविणे यामुळे माझे विद्यार्थी हे कला क्षेत्रात तरबेज झाले आहेत.
शिल्पकार संदिप ताम्हणकर आपल्या मनोगतात म्हणाले की, विद्यार्थ्यांच्या कलाकृती परीक्षण करताना खूप काही शिकायला मिळाले. परीक्षण करताना माध्यमाचा विचार केला. या व्यावसायिक स्पर्धेत डिजिटल युगात जगत असताना आपण कसे टिकून राहू, हे पाहिले पाहिजे.
यावेळी बोलताना ज्येष्ठ चित्रकार शिल्पकार प्रकाश अर्जुन राजेशिर्के आपल्या मनोगतात मिळाले की, विद्यार्थी वर्षभर घेत असलेली मेहनत त्यांच्या कामातून आपल्याला या प्रदर्शनात पाहायला मिळत आहे. विद्यार्थ्यांनी केलेली कामे कलारसिकांना खरेदी करण्याची सोय देखील या ठिकाणी करण्यात आल्याने कला रसिकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन राजेशिर्के यांनी केले. सह्याद्री कला महाविद्यालयात घडणारे कलाकार हे स्वतःच्या वेगळ्या शैलीत काम करत असल्याने, ते राज्यभर आपल्या कामाचा ठसा उमटवतात याचा आम्हाला अभिमान आहे असे राजेशिर्के यांनी नमूद केले.
तसेच या कला प्रदर्शनाचे औचित्य साधून प्रतिवर्षी शिक्षण महर्षी स्वर्गीय गोविंदजी निकम कला जीवन गौरव पुरस्कार प्रदान करण्यात येतो. कला क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणार्या तसेच सामाजिक बांधिलकी जपणार्या कलाकाराला या पुरस्काराने गौरवण्यात येते यावर्षी हा गौरव सलीम अल्लाबक्ष मणेरी कलाशिक्षक यांना प्रशांत निकम यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
या प्रदर्शनात शंभरहून अधिक कलाकारांच्या ५००हून अधिक कलाकृती मांडल्या आहेत.तसेच १५ फूट उंचीची नटराज मूर्ती नृत्यकलेची अधिष्ठात्री देवता म्हणून नटराज या रूपात शिवाचे महत्त्व आहे.या कलाप्रदर्शनाचे औचित्य साधून प्रतिवर्षी कलामहाविद्यालयातील विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी प्रोत्साहन व कौतुकाची थाप म्हणून विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात येते. यावर्षी पुरस्कारासाठी निवडल्या गेलेल्या विद्यार्थ्यांची नावे खालीलप्रमाणे.
मूलभत अभ्यासक्रम -प्रथम पारितोषिक – साहिल परुळेकर द्वितीय पारितोषिक- मिथिल अंगचेकर , उत्तेजनार्थ पारितोषिक- ज्योती पांचाळ , उत्तेजनार्थ पारितोषिक-विराज पाचाडकर
कलाशिक्षक पदविका – प्रथम पारितोषिक-भूषण वेलये , द्वितीय पारितोषिक- सोनल घाणेकर , उत्तेजनार्थ पारितोषिक- नवाज हमदुले , उत्तेजनार्थ पारितोषिक- भार्वी गोरुले. रेखा व रंगकाला विभाग – प्रथम पारितोषिक- सुजन निवाते , द्वितीय पारितोषिक- सिद्धी मांडे , उत्तेजनार्थ पारितोषिक- साक्षी रेवणे , उत्तेजनार्थ पारितोषिक- सिद्धार्थ भोवड, शिल्प व प्रतिमानबंध कला- प्रथम पारितोषिक – वेदांत गाणबोटे, द्वितीय पारितोषिक – प्रथमेश पाचाडकर , उत्तेजनार्थ पारितोषिक. सार्थक आदवडे , उत्तेजनार्थ पारितोषिक- स्वयम वर्दन, उत्कृष्ट निसर्गचित्रण कलाकृती. तुळशी भुवड , उत्कृष्ट सृजनात्मक कलाकृती. तेजल गडदे , उत्कृष्ट रेखांकन पारितोषिक. सुजल निवाते , उत्कृष्ट व्यक्तीचित्रण कलाकृती. सौरभ साठे , उत्कृष्ट त्रिमित संकल्प (मूलभूत अभ्यासक्रम) – साहिल परुळेकर , उत्कृष्ट व्यक्तिचित्रं कलाकृती- प्रथमेश गोंधळी , उत्कृष्ट रचना चित्रण कलाकृती – शुभम घोरपडे, उत्कृष्ट रचना चित्रण कलाकृती ( रेखा व रंगलाविभाग अंतिम वर्ष)- सुजल निवाते, सर्वोत्कृष्ट मुद्रा चित्रण कलाकृती- मधुरा पाटणे,
उत्कृष्ट सृजनात्मक व्यक्तिचित्रण चित्राकृती – सुजल निवाते, विशाल मसणे,अभिषेक बाटले.
सर्वोत्कृष्ट सृजनात्मक कलाकृती – सुजल निवाते, शिक्षण महर्षी स्वर्गीय गोविंदरावजी निकम आदर्श विद्यार्थी पारितोषिक. विशाल मसणे, प्रकाश अर्जुन राजेशिर्के पुरस्कृत स्वर्गीय सौ.प्रभावती बाई बरांजि राजेशिर्के कला महाविद्यालयातून आदर्श विद्यार्थिनी.तुळशी भुवड.कला शिक्षक पदविका अभ्यासक्रमातील आदर्श विद्यार्थिनी स्वर्गीय श्रीमती सिद्धी सुधीर मोरे स्मरणार्थ – साक्षी जाधव.
या कार्यक्रमाच्या अंतिम टप्प्यात चित्रकार विजय टिपूगडे , बबन माने, विजय उपाध्याय, सतिश सोनवडेकर यांनी आपले प्रात्यक्षिक सादर केले.या प्रदर्शनाचे अजून एक खास आकर्षण म्हणजे या कला प्रदर्शनाचा व विक्रीचा आस्वाद घ्यावा असे आवाहन कला महाविद्यालयाचे प्राचार्य माणिक शिवाजी यादव यांनी केली आहे.