(रत्नागिरी)
कोकण रेल्वे मार्गावरील प्रवाशांना रेल्वे प्रशासनाने मोठा दिलासा दिला आहे. कोकण रेल्वे मार्गावरील उन्हाळी सुट्टयांमधील प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन मुंबईतील लोकमान्य टिळक टर्मिनस ते कोचुवेली दरम्यान २४ अतिरिक्त उन्हाळी विशेष गाड्या चालवण्याचा महत्वपूर्ण निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. गुरुवार ११ एप्रिल २०२४ पासून या विशेष गाड्यांच्या फेऱ्या सुरू होणार आहेत. यासंदर्भात मध्य रेल्वे प्रशासनाने माहिती दिली आहे. या गाड्यांचे आजपासून बुकिंग सुरू झाले आहे.
Also Read : उमरोली येथील देवी निंगुबाई भैरीसाठी १ हजार १ नारळाचे आसन!
लोकमान्य टिळक टर्मिनस-कोचुवेली साप्ताहिक विशेष ०१४६३ साप्ताहिक विशेष गाडी ११ एप्रिल ते २७जूनपर्यंत दर गुरुवारी लोकमान्य टिळक टर्मिनस येथून सायंकाळी ४.०० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी रात्री ८.४५ वाजता कोचुवेली येथे पोहोचेल, तर परतीच्या प्रवासासाठी ०१४६४ साप्ताहिक विशेष कोचुवेली १३ एप्रिलपासून ते २९ जूनपर्यंत दर शनिवारी सायंकाळी ४.०० वाजता कोचुवेली येथून सुटेल
आणि दसऱ्या दिवशी रात्री ०९.५० वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई येथे पोहोचेल. या गाड्यांना ठाणे, पनवेल, रोहा, चिपळूण, रत्नागिरी, कणकवली, सिंधुदुर्ग, सावंतवाडी रोड, मडगाव जंक्शन, कारवार, कुमटा, कुंदापुरा, उडुपी, मंगळुरु
जंक्शन, कासरगोड, कण्णूर, कोषिक्कोड, तिरूर, षोरणूर, त्रिसूर, एरणाकुलम जं, कोट्टानम तिरुवल्ला, चेंगन्नूर, कायमकुलम आणि कोल्लम जं. येथे थांबे देण्यात येणार आहेत. या विशेष गाडीला प्रथम वातानुकूलित, १ प्रथम वातानुकूलित कम वातानुकूलित द्वितीय, २ वातानुकूलित द्वितीय, ६ वातानुकूलित तृतीय, २ गार्ड्स ब्रेक व्हॅनसह ८ जनरल सेकंड क्लास डबे जोडण्यात येणार आहेत.
आजपासून बुकिंग सुरू
उन्हाळी विशेष ट्रेन ०१०७९ आणि ०१४६३ साठी विशेष शुल्कावर बुकिंग सोमवार ०८ एप्रिलपासून सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि www. irctc.co.in या संकेतस्थळावर उघडेल. विशेष गाड्यांच्या थांब्यांच्या तपशीलवार वेळेसाठी www.enquiry.indianrail.gov.in ला भेट द्या किंवा एनटीईएस अॅप डाउनलोड करा. प्रवाशांनी या उन्हाळी विशेष रेल्वे सेवांचा लाभ घ्यावा असे आवाहन रेल्वे प्रशासनाकडन करण्यात आले आहे.
Follow us on Google News : https://news.google.com/s/CBIw9dzq7KQB?sceid=IN:en&sceid=IN:en&sceid=IN:en&r=0&oc=1