जय जय रघुवीर समर्थ. बर असा प्रसंग झाला झाला तो होऊन गेला आता तरी ब्राह्मणांनी शहाणं व्हायला हवं. निर्मल हाताने देव पूजावा त्यामुळे सर्व प्रकारचे भाग्य प्राप्त होईल. शिस्त नसेल तर मूर्खपणामुळे दारिद्र्य भोगावे लागेल. आधी देवाला ओळखावं, मग अनन्यभावे भजन करावं. सर्वोत्तमाचं अखंड ध्यान करावं. सर्वांमध्ये उत्तम आहे त्याचं नाव सर्वोत्तम. आत्मानात्म विवेकाचं गुपित जाणून घ्यावे. जाणीवेमुळे देहाचे रक्षण करण्याचं जाणतो असा आत्मा हा दृष्टा आहे तो आतले सर्व ओळखतो. तो जाणून सर्व गोष्टींचे परीक्षण करतो. आत्मा सगळ्या देहांमध्ये राहतो. इंद्रियाच्या सगळ्या क्रिया घडवून आणतो. अनुभवाने याचा सगळ्या प्राण्यांना प्रत्यय येतो. जगताच्या अंतर्यामी प्राणिमात्री तो आहे म्हणून सगळ्यांचे मन राखावे. दाता भोक्ता सगळं काही तोच आहे.
देव सगळ्या जगामध्ये वास करतो तोच आपल्या आतमध्ये आहे. त्रैलोक्यातील प्राणीमात्र पाहिल्यावर हे लक्षात येतं. मुळातच पाहणारा तो एकटा आहे, सगळ्यांच्या ठाई तोच विभागलेला आहे. देहाच्या प्रकृतीमुळे तो भिन्न भिन्न झालेला आहे. देहाच्या आकारामुळे जरी भिन्न झालेला असला तरी अंतकरणाने जाणीवरूपाने तो एकच आहे. बोलणं चालणं, निर्धार वगैरे त्याच्यामुळे घडतो. तो आपले परके सगळे लोक असतात, पक्षी,श्वापदे, पशु, कीडा, मुंगी, देहधारक सगळे प्राणी, खेचर. भूचर, वनचर, नाना प्रकारचे जलचर विस्तार किती उलगडून सांगायचा? सगळ्यांची जाणीव एकच असते तिची अखंड संगत असते. जगामध्ये एखाद्याची स्तुती केली तर तो प्रसन्न होण्याची जी कृती आहे ती आपल्यापाशीच आहे. त्याच्यासाठी आपल्याला सगळ्यांना राजी राखायला पाहिजे.
देहाला बरं करायचं ते आत्म्यापर्यंत पोहोचतं, दुर्जन प्राणी असतो त्याच्यामध्ये देखील देव असतो, त्याचा चुकीचा स्वभाव असला, तो रागावला तरी त्याच्याशी भांडण करू नये. प्रसंगी ते सोडून द्यावं. पुढे विचारपूर्वक वागावे. विवेकाने सगळ्या लोकांशी सज्जनतेने वागावं. आत्मतत्त्वांमध्ये भेद दिसतो हा देहाचा वेगळेपणा आहे. जल पदार्थ एक असला तरी औषधी वेगवेगळ्या असल्याने नाना स्वाद पाहायला मिळतात. विष आणि अमृत दोन्ही पाणीच आहे म्हणजे ते द्रव पदार्थच आहे. त्याप्रमाणे आत्म्याला साक्षीत्वाने पाहिले पाहिजे. अंतरनिष्ठ असा जो पुरुष तो आपल्या अंतरनिष्ठेने विशेष असतो. जगामध्ये असलेल्या जगदीशाला तो ओळखतो. डोळ्यांनी डोळे पहावे, मनाने मन शोधावे, तसा हा भगवान आहे. आपल्या अंतरात्म्याने दुसऱ्याच्या ठिकाणी असलेल्या अंतरात्म्याला ओळखावे. त्याच्याशिवाय कार्यभाग आडून राहतो, सगळे काही काही त्याच्यामुळे घडतं. त्याच्यामुळेच प्राणी विचारपूर्वक वागतो.
जागृतीमुळे व्यापार घडतो, त्याच्याशी संबंध पडतो आणि स्वप्नामध्ये घडतं ते त्याचप्रमाणे घडतं. अखंड ध्यानाचे लक्षण, अखंड देवाच स्मरण याचं कळता कळता विवरण सहज होतं. सहज सायास सोडून आत्मा सोडून अनात्म्याचे ध्यान करतात हाच एक दोष आहे. पण ते धरले तरी धरले जात नाही, ध्यानात वेगवेगळ्या व्यक्ती येतात आणि त्याच्यामुळे उगाच कष्ट होतात, आणि मन कासावीस होतं. मूर्तीचे ध्यान प्रयत्नपूर्वक केलं तिथे एकाऐवजी दुसरेच विलक्षण दिसतं. जे भासू नये तेच भासते; म्हणून ध्यान देवाचं करावं किंवा देवालयाचं करावं हेच बरं. देह देऊळ आहे आणि आत्मा हा देव आहे. देव ओळखून तिथेच जीव लावायचा. असे अंतर्निष्ठ ध्यान केले की रूढ पद्धतीनुसार केलेले ध्यान त्याच्यामुळे आपोआप साध्य होते. प्रत्यय असल्याशिवाय अनुमानाने केलेले ध्यान म्हणजे सगळा वेडेपणा आहे! असा इशारा समर्थ देत आहेत. हा भाग इथे समाप्त झाला असून पुढील कथा ऐकू या पुढील भागात.
जय जय रघुवीर समर्थ.
पद्माकर देशपांडे
(निरूपणकार पत्रकार / लेखक)
मोबा. 9420695127