(रत्नागिरी)
प्रतिवर्षाप्रमाणे भाद्रपद शुक्ल प्रतिपदा ते भाद्रपद शुक्ल पंचमी शके १९४६ बुधवार दि. ४/९/२०२४ ते रविवार दिनांक ८/९/२०२४ पर्यंत “श्रीं” चे मंदिरात भाद्रपदी गणेशोत्सवानिमित्त विविध कार्यक्रम संपन्न होणार आहेत. या कार्यक्रमाची सुरुवात श्री गणेशा आज श्रींच्या महापूजा आरती आणि मंत्रपुष्पांजली द्वारे समस्त उपस्थित ब्रम्हवृंदांच्या मंत्रघोषात आणि सर्व ग्रामस्थ कर्मचारी वृंद आणि भक्तगणांच्या उपस्थितीत अतिशय मंगलमय वातावरणात संपन्न झाला. आजची महापूजा संस्थान श्री देव गणपतीपुळे विश्वस्त श्री निलेश कोल्हटकर यांचे हस्ते सपत्नीक संपन्न झाली.
उद्या दिनांक 5.9.2024 रोजी दुपारी 11 ते 12 या वेळेत श्रींना सहस्र मोदक समर्पण करण्यात येणार आहेत. त्याचबरोबर दररोज सायंकाळी सात ते साडेसात या वेळेत आरती आणि मंत्रपुष्प कार्यक्रम आयोजित केला आहे. तसेच दररोज सायंकाळी साडेसात ते रात्र साडेनऊ या वेळेत ह.भ.प सौ रोहिणी माने परांजपे (रा. पुणे) यांचे सुश्राव्य कीर्तनाचा आस्वाद भक्तगणांना घेता येणार आहे. रविवार दिनांक 15 9 2024 रोजी वामन जयंती म्हणजेच वामन द्वादशीच्या दिवशी दुपारी साडेअकरा ते दोन या वेळेत महाप्रसादाच्या माध्यमातून उत्सवाची सांगता होईल. यासाठी संस्थान श्री देव गणपतीपुळे च्या सर्व विश्वस्त कमिटी सर्व कर्मचारीवृंद तसेच सर्व ब्रह्मवृंद यांचे मार्फत त्याचे उत्तम नियोजन करण्यात आले आहे, अशी माहिती मुख्य पुजारी श्री. अमित प्रभाकर घनवटकर यांनी दिली