(लाईफ स्टाईल)
जी व्यक्ती सक्रीय असते ती स्वप्न बघते, आणि जी व्यक्ती स्वप्न बघत नाही ती व्यक्ती जीवंत असू शकत नाही. थोडक्यात प्रत्येक जीवंत व्यक्ती स्वप्न बघतेच. झोपेत असताना जवळजवळ प्रत्येकजण स्वप्न पाहतो. काही स्वप्ने चांगली असतात तर काही स्वप्ने वाईट. प्रत्येक स्वप्नामागे नक्कीच काहीतरी अर्थ दडलेला असतो. स्वप्न शास्त्रानुसार, प्रत्येक स्वप्नामागे असे काही संकेत लपलेले असतात जे तुम्हाला येणाऱ्या काळाबद्दल सावध करतात. अशा स्वप्नांना सुचक स्वप्न म्हणतात. शास्त्रात सांगितले आहे की, जी स्वप्ने एखाद्या व्यक्तीला शुभ संकेत देतात ते कधीही इतरांना सांगू नयेत. असे केले तर ती स्वप्ने कधीच पूर्ण होत नाहीत. फक्त जन्माने अंध व्यक्ती स्वप्न बघू शकत नाहीत, पण त्यांना स्वप्नात ध्वनी एकता येतो. म्हणजेच त्यांना देखील स्वप्न पडते. आणि स्वप्न काय झोपतानाच पडतात असं नाही, ती जागेपणी पण पडत असतात.
स्वप्नांचे दोन प्रकार पडतात
१ जागृत अवस्थेमधील स्वप्न :
२ निद्रावस्थे मधील स्वप्न :
स्वप्नांचे फल केंव्हा मिळते ?
स्वप्न रात्री तीन वाजल्या पासून ते पहाटे सुर्योदया पूर्वी पडलेल्या स्वप्नांचे फलीत लवकरच मिळते साधारणतः सात दिवसा मध्ये आपल्याला याची प्रचीती येते. मध्य रात्री पडलेले स्वप्न ( रात्री १२. ते पहाटे ०३ दरम्यान पडलेले स्वप्न ) साधारणतः एक महीन्यात आपले फल देते व मध्यरात्रीपुर्वी पडलेले स्वप्न एक वर्षाभरामध्ये आपले फल देते, असे मानले जाते.
पहाटे पडलेली स्वप्न खरी होतात हा समज सर्वत्र आहे. पण त्यात काही प्रमाणात सत्य असले तरी जसे स्वप्न दिसले तसेच ते घडणार असे नसून विशिष्ट स्वप्न पडले असता त्याचा विशिष्ट अर्थ असतो.
शुभ स्वप्न फल विचार
1 . स्वप्नामध्ये जर एखाद्या पुरुषाला डोक्यावर घर जळताना दिसले, तर त्याला अधिकार प्राप्त होण्याचा योग बनतो.
2 . स्वप्नामध्ये जर एखाद्या पुरुषाला कानात कुंडल, डोक्यावर मुकुट व गळ्यात मोत्याची माळ गातलेली दिसेल, तर निश्चितच उच्चाधिकार व त्यातून लाभ प्राप्त होतात. स्वप्नामध्ये जर एखाद्या पुरुषाला आपण आपल्या शत्रूंना पराजीत करताना दिसला तर त्याला बढती हमखास मिळते.
3 . स्वप्नामध्ये जर एखाद्या पुरुषाला गाय, बैल, पक्षी, हत्ती यांच्यावर चढून स्वतः जर समुद्र पार करताना पाहील्यास त्याला जास्त मोठा अधिकार प्राप्त होण्याचा योग बनतो.
4 . एखाद्यास जर कमळाच्या पानावर बसून स्वतः खीर खाताना पाहीले तर त्याला राजकीय पद निवडणुक जिंकण्याचा योग वा मंत्री पद प्राप्त होते.
5 . एखाद्या स्त्रीला जर स्वप्नात आपल्या योनिचे क्षेत्र विकसित होताना दिसले तर तीला निश्चीतच कोणत्या तरी पुरुषाची संपत्ती प्राप्त होण्याचा योग असतो.
6 . स्वप्नामध्ये जर एखाद्या पुरुषाला स्वतःचे सगळे केस गळून गेलेले व स्वतःला टक्कल पडलेले दिसले तर त्याला अमुल्य धनप्राप्ती होते.
7 . स्वप्नामध्ये जर एखाद्या पुरुषाला कुंभार मडके बनवताना दिसल्यास त्याचे स्वतःवरचे संकट लवकरच दूर होणार व धनलाभ होणार असे समजावे.
8 . स्वप्नामध्ये जर एखाद्या पुरुषाला स्वतः उंच भींतीवर बसलेले पाहील्यास सुख-संपत्ती प्राप्त होते.
9 . स्वप्नामध्ये जर एखाद्या पुरुषाला स्वतःच्या वयापेक्षा मोठे झालेले दिसले तर त्याला मान-सम्मान प्राप्त होतो.
अशुभ स्वप्न फल विचार
1 . एखाद्या स्त्रीला जर स्वप्नात स्वतःला टक्कल पडलेले दिसले तर गरीबीचा सामना करण्याचे योग संभवतात.
2 . एखाद्याला स्वप्नामध्ये जर स्वतःस दुर्घटना घडताना दिसली तर लवकरच आजारपण संभवते.
3 . एखाद्याला स्वप्नामध्ये जर स्वतः प्रवासासाठी वाहनद्वारे जाण्याची तयारी करताना दिसल्यास त्याला योजलेला प्रवास रद्द केलेलाच बरा कारण अपघात भय असते.
4 . एखाद्याला स्वप्नामध्ये जर स्वतः आरशे फोडत असल्याचे दिसले, त्याच्या परीवारात कोणाचा तरी मृत्युसम संकट येते.
5 . एखाद्याला स्वप्नामध्ये ज मुंग्याना स्वतः मारताना पाहील्यास व्यापार नाश संभवतो.
6 .एखाद्याला स्वप्नामध्ये जर स्वतःची नाव/ होडी तूफानी वादळात फसलेली दिसल्यास येणारा काळ त्रासदायक असण्याची ही सूचना समजावी.
7 . एखाद्याला स्वप्नामध्ये जर स्वतः कडू औषध घेताना पाहिल्यास जीवनात अनेक प्रकारच्या समस्या येण्याचे संकेत आहेत.
8 . स्वप्नात रडणारे बालक दिसणे आजारपण व जीवनात निराशा यांची सूचना देते.
इतर फल विचार
1 . एखाद्या स्त्रीला ( युवती ) जर स्वप्नात रत्नजड़ीत आंगठी अथवा नेकलेस बघते, तीचे वैवाहीक जीवन सुखी होते.
2 . एखाद्या स्त्रीला ( युवती ) जर स्वप्नात स्वतःस कोण्या मित्राने दिलेल्या बांगड्या घालताना पाहील्यास शीघ्र विवाह होतो.
3 . स्वप्नामध्ये जर एखाद्या पुरुषाला कोणतेही सुंदर वस्त्र दिसल्यास त्याला मधुर स्वभावाची पत्नी प्राप्त होते.
4 . स्वप्नामध्ये जर एखाद्या पुरुषाला बाईचे घूंघट उघडून बघताना दिसते, जीवन सुखमय व्यतीत होते.
5 . स्वप्नामध्ये जर एखाद्या पुरुषाला आपली हरवलेली वस्तु पुन्हा मिळवल्यास त्याला आगामी जीवनात सुख मिळते.
6 . एखाद्या स्त्रीला ( युवती ) जर स्वप्नात स्वतःस मेळा यात्रा, जत्रा, कार्नीवल, मॉल, अथवा फॅशन शोमध्ये स्वतः भाग घेतला असेल तर शुभ समजले जाते.
7 . एखाद्याला स्वप्नामध्ये जर इंद्रधनुष दिसल्यास वास्तविक जीवन सुखमय राहील.
8 . एखादी अविवाहित युवती आपल्या प्रेमीला कोण्या दुसर्याच युवतीशी विवाह करताना पाहीले तर तीचा विवाह शीघ्र होतो.
10 . स्वप्नामध्ये जर एखाद्या पुरुषाला कोणत्याही सुंदर व स्वस्थ्य नवजात बालकाला ( शिशु ) बघितल्यास संतान प्राप्त होणार असते.
11 . एखाद्या स्त्रीला जर स्वप्नात पुरुष आंगठी भेट देताना दिसले तर पती हिच्यावर खुपच प्रेम करेल.
मिश्रीत स्वप्न फल विचार
- स्वप्नाध्ये जर एखाद्या पुरुषाला जीवंत गिधाड दिसले तर सौभाग्य वृद्धि ,जर गिधाड आकाशात उंच उडताना दिसल्यास जास्त लाभदायक असते.
- स्वप्नामध्ये जर एखाद्या पुरुषाला साफ-सुथरी स्मशान भूमी दिसल्यास व्यापार वृद्धि होण्याची शक्यता असते.
- स्वप्नामध्ये जर एखाद्या पुरुषाला स्वतःस पुस्तक वाचताना पाहील्यास समाजात मान-सम्मान वाढतो.
- स्वप्नामध्ये जर मशीनने कोणासही गवत कापताना पाहील्यास सौभाग्य वृद्धी होते.
- स्वप्नामध्ये जर एखाद्या पुरुषाला कोण्या युवतीला कानातले ( कर्णफूल ) घालताना पाहीले तर लवकरच शुभवार्ता ऐकण्यास मिळेल.
- स्वप्नामध्ये जर एखाद्या पुरुषाला धान्याची रास दीसेल, तर स्वतःच्या परीश्रमाने सफलता प्राप्त होईल, सहज मार्गाने धनप्राप्त होईल
- स्वप्नामध्ये जर एखाद्या पुरुषाला स्वतः कॉफी अथवा चाहा पिताना पाहील्यास त्याला जीवनात हर्ष्-उल्हास व समृद्धी लाभेल.
- स्वप्नामध्ये जर एखाद्या पुरुषाला स्वतःच्या हात व पायात दुखत असल्याचे दिसल्यास धन प्राप्ती होते.
- स्वप्नामध्ये जर एखाद्या पुरुषाला कारागीर बनून घर बनवताना पाहिल्यास जीवनात अपार सफलता मिळेल.
स्वप्नात मृत व्यक्तीचे अस्तित्व
- स्वप्नशात्रानुसार, जर एखाद्या व्यक्तीने स्वप्नात स्वतःचा मृत्यू पहिला असेल तर हे स्वप्न अत्यंत शुभ स्वप्न मानले जाते. या स्वप्नाचा अर्थ असा होतो की, तुमचे आयुष्य आणखी वाढणार आहे. त्यामुळे घाबरून जाण्याचे काही कारण नाही. हे स्वप्न असे देखील सूचित करते की, तुमच्या आयुष्यात येणारी सर्व संकटे आता संपणार आहेत. बऱ्याच काळापासून तुम्हाला त्रास देत असलेल्या समस्यांपासून तुमची सुटका होणार आहे.
- स्वप्नशास्त्रानुसार, जर तुमच्या स्वप्नात मृत व्यक्ती रडताना किंवा रंगवताना दिसली असेल तर हे एक अशुभ स्वप्न मानले जाते. जर तुमच्या स्वप्नात तुमच्या परीवारातली एखादी मृत व्यक्ती तुमच्यावर रागावत आहे किंवा स्वप्नात रडताना दिसली असेल तर या स्वप्नाचा अर्थ असा होतो की, तुम्ही तुमच्या आयुष्यात ज्या गोष्टी करत आहात त्या गोष्टी चुकीच्या आहेत त्यामुळे ती व्यक्ती तुमच्यावर नाराज आहे.
- स्वप्नशात्रानुसार, जर एखाद्या व्यक्तीला स्वप्नात आपल्या कुटुंबातील व्यक्ती दिसत असेल आणि ती व्यक्ती जर ती व्यक्ती आनंदी दिसत असेल तर हे स्वप्न शुभ मानले जाते. या स्वप्नाचा अर्थ असा होतो की, त्या व्यक्तीचा जन्म चांगल्या ठिकाणी झाला आहे आणि ती व्यक्ती आनंदी आहे.
- स्वप्नशात्रानुसार, जर एखाद्या व्यक्तीला स्वप्नात आपल्या कुटुंबातील व्यक्ती दिसत असेल आणि ती व्यक्ती जर दुःखी किंवा रडताना दिसली असेल तर हे स्वप्न अशुभ मानले जाते. या स्वप्नाचा अर्थ असा होतो की, त्या व्यक्तीची एखादी इच्छा अपूर्ण राहिली आहे.
- कधीकधी आपण स्वप्नात मृत व्यक्ती पाहतो, तो आपल्याला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत असतो पण आपण त्याचे शब्द समजू शकत नाही, असे स्वप्न चांगले मानले जात नाही. हे स्वप्न तुमच्या आयुष्यातील काही अप्रिय घटना दर्शवते. अशा परिस्थितीत आपण सावधगिरी बाळगली पाहिजे आणि अशा स्वप्नांनी विसरून जाण्याचा प्रयत्न केला पाहिजे.
- स्वप्नशास्त्रानुसार, जर तुम्हाला तुमच्या स्वप्नात मृत व्यक्ती किंवा तुमचे पूर्वज एखादा उपदेश देत असतील तर हे स्वप्न तुमच्यासाठी शुभ स्वप्न मानले जाते. या स्वप्नाचा अर्थ असा होतो की, तुम्ही तुमच्या आयुष्यात एखादे कार्य करणार आहात आणि त्याबाबतीत जर मृत व्यक्ती तुम्हाला उपदेश देत असेल तर त्या गोष्टींमध्ये तुमचा फायदा होऊ शकतो. तुमची कार्ये पूर्ण होऊ शकतात आणि त्यात तुम्हाला यश मिळू शकेल.
- बहुतेकवेळा आपले पूर्वज आपल्याला स्वप्नात दिसतात परंतु ते काहीच बोलत नाहीत. स्वप्नशात्रानुसार, जर एखाद्या व्यक्तीला स्वप्नात त्याचे पूर्वज दिसले असतील आणि ते काहीच बोलले नसतील तर या स्वप्नाचा अर्थ असा होतो की, आपले पूर्वज आपल्याला एखादी वाईट गोष्ट करण्यापासून सावध करत आहेत.
- जर व्यक्तीला स्वप्नात त्याचे पूर्वज दुःखी किंवा नाराज दिसत असतील तर याचा अर्थ असा होतो की, आपण करत असलेल्या कामामुळे ते आपल्यावर नाराज आहेत.
- स्वप्न शात्रानुसार, जर एखादी व्यक्ती स्वप्नात मृत व्यक्तीसोबत बोलतानाचे स्वप्न पाहत असेल तर हे स्वप्न शुभ मानले जाते. या स्वप्नाचा अर्थ असा होतो की, स्वप्नात आलेली व्यक्ती तुमच्यावर खुश आहे. लवकरच तुमच्या आयष्यात काहीतरी चांगले घडणार आहे.
- स्वप्नशात्रानुसार, जर तुम्हाला स्वप्नामध्ये मृत व्यक्ती आनंदात किंवा तुमच्या सोबत संवाद साधताना दिसली असेल तर हे स्वप्न तुमच्यासाठी एक शुभ स्वप्न मानले जाते. या स्वप्नाचा अर्थ असा होतो की, स्वप्नात आलेले पितृ किंवा मृत व्यक्ती तुमच्यावर खुश आहे आणि त्या व्यक्तीचा आशीर्वाद तुमच्यावर असून लवकरच तुमच्या आयुष्यात प्रगती होणार आहे.
- स्वप्नशात्रानुसार, जर तुम्हाला स्वप्नामध्ये मृत व्यक्ती उपाशी दिसत असेल किंवा ती व्यक्ती तुमच्याकडे अन्न मागत असेल तर हे स्वप्न अशुभ मानले जाते. या स्वप्नाचा अर्थ असा होतो की, तुमच्या पितरांची कोणतीतरी इच्छा-अपेक्षा अपूर्ण राहिली असेल. त्यांच्या आत्म्यास शांती मिळावी म्हणून तुम्ही तुमच्या इच्छेनुसार गरिबांना, भुकेल्यांना अन्नदान किंवा वस्त्रदान करू शकता.
- स्वप्नशास्त्रानुसार, जर तुमच्या घरातील एखादी व्यक्ती किंवा तुमचा एखादा मित्र किंवा नातेवाईक रोगामुळे मरण पावला असेल आणि तो तुमच्या स्वप्नात निरोगी दिसत असेल आणि खूप आनंदी दिसत असेल तर हे स्वप्न शुभ स्वप्न आहे, त्यामुळे तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. या स्वप्नाचा अर्थ असा आहे की त्या व्यक्तीचा जन्म चांगल्या ठिकाणी झाला आहे आणि ती व्यक्ती आनंदी आहे.
कोणती स्वप्ने गोपनीय ठेवली पाहिजेत असे मानले जाते
स्वतःचा मृत्यू
जर एखाद्या व्यक्तीला स्वप्नात स्वतःचा मृत्यू दिसला तर स्वप्न शास्त्रानुसार असे स्वप्न शुभ मानले जाते. या स्वप्नाचा फायदा तेव्हाच मिळतो जेव्हा तो कोणाशीही शेअर केला जात नाही. असे स्वप्न आगामी आनंदाचे संकेत देते. अशा वेळी हे स्वप्न कोणाला सांगितल्यास येणारा आनंद दिसतो.
स्वप्नात देव दिसणे
जर एखाद्या व्यक्तीला स्वप्नात देव दिसत असेल तर हे लक्षण आहे की तुमच्या नोकरीशी संबंधित समस्या लवकरच दूर होणार आहेत. नोकरीशी संबंधित कोणतीही चांगली बातमी मिळू शकते. अशी स्वप्ने गुप्त ठेवली पाहिजेत.
पिण्याचे पाणी
जर एखाद्या व्यक्तीने स्वप्नात आई-वडिलांना पाणी पिताना पाहिले तर ते शुभ स्वप्न मानले जाते. अशी स्वप्ने इतरांसोबत शेअर करू नयेत. ही स्वप्ने व्यक्तीच्या प्रगतीशी संबंधित असतात. ते कोणाशीही शेअर केले तर ते प्रगतीत अडथळा ठरतात.
चांदीने भरलेला कलश
रात्री स्वप्नात चांदीने भरलेला कलश पाहणे शुभ मानले जाते. असे म्हणतात की हे स्वप्न देवी लक्ष्मीच्या कृपेने प्राप्त होते. हे स्वप्न कोणाला सांगितल्यास लक्ष्मी मागे वळते. हे स्वप्न इतरांसोबत कधीही शेअर करू नये.
(वरील माहिती समाजमान्यता आणि उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)