(रत्नागिरी)
तालुक्यातील पाली येथे जागेची मोजणी सुरु असताना एकाला पाच जणांनी शिवीगाळ करत मारहाण केली. ही घटना मंगळवार, १५ ऑक्टोबर रोजी दुपारी १.४५ वा. सुमारास घडली. अशोक सावंत, मिलिंद सावंत, मोहन सावंत, मुग्धांक सावंत, अविनाश सावंत अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या पाच संशयितांची नावे आहेत. त्यांच्या विरोधात भरत रामचंद्र सावंत (४५) यांनी ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.
त्यानुसार, भरत सावंत आणि संशयित ५ जणांची पाली वडाचे भाटले या ठिकाणी जमिन आहे. मंगळवार १५ ऑक्टोबर रोजी या जागेची मोजणी चालू असताना भरत सावंत तिथे गेले असता संशयित ५ जणांनी त्यांना तू या जागेत पाय टाकायचा नाही, असे सांगितले. त्यानंतर अशोक सावंतने भरत सावंत यांची कॉलर पकडून उर्वरित ४ संशयितांनी त्यांना मारहाण करीत धमकी दिली. या प्रकरणी संशयितांविरोधात ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.