(रत्नागिरी)
दिराने वहिनीला अज्ञात कारणामधून हत्याराने मारहाण केल्याची घटना वाटद – खंडाळा (ता. रत्नागिरी) रविवारी सकाळी घडली. या मारहाणीत जागृती दिलीप ढवळे जखमी झाल्या आहेत. या मारहाणीच्या प्रकरणाबाबत जयगड पोलिस स्थानकात विलास धोंडू ढवळे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जागृती ढवळे यांनी जयगड पोलिस स्थानकात फिर्याद दिली आहे. त्या रविवारी सकाळी अंगणात कपडे वाळत घालत होत्या. त्यावेळी दीर विलास ढवळे याने तेथे येऊन त्यांना ढकलाबुकल करत हत्याराने मारहाण केली. यामध्ये त्या जखमी झाल्या आहेत. वाद सोडवण्यासाठी मध्ये पडलेल्या संकेत ढवळे आणि सुचिता ढवळे यांनाही विलास ढवळे याने शिवीगाळ केली. त्याच्यावर भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ चे कलम ११८ (१), ११५ (२), ३५१ (२), ३५२ प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे.