(रत्नागिरी)
नोकरीसाठी परजिल्ह्यातून आल्याच्या रागातून तरुणाची दोन अज्ञातांनी दुचाकी भररस्त्यात अडवून शिवीगाळ करून मारहाण देखील केली. तालुक्यातील शिवार आंबेरे येथे ही घटना रविवार, २३ जून रोजी रात्री ११.२० वा. घडली. या मारहाण प्रकरणी दोन अज्ञातांविरोधात पूर्णगड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या मारहाण प्रकरणी शरद देवीदा हुमे (३७, रा. फिनोलेक्स नगर गोळप, रत्नागिरी) यांनी पूर्णगड पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार, रविवारी रात्री फिर्यादी शरद हुमे हे आपल्या ताब्यातील दुचाकी (एमएच-०८-एके-३४१३) वरून येत असताना दोन अज्ञातांनी संगनमताने त्यांची दुचाकी जबरदस्तीने थांबवली. त्यानंतर दुचाकीची चावी काढून घेऊन परजिल्ह्यातून नोकरीसाठी आल्याच्या कारणातून हूने यांना मारहाण करत शिवीगाळ व दमदाटी केली. या प्रकरणी संशयितांविरोधात भादंवि कायदा कलम ३४१, ३२३, ५०४, ५०६, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.