(संगमेश्वर / एजाज पटेल)
मुंबई-गोवा महामार्गाचे काँक्रीटीकरणाचे काम सुरू आहे. या कामामुळे महामार्गावर सध्या धुळीचे साम्राज्य पसरले आहे. महामार्गवरील बावननदी ते आरवली पर्यंत अनेक ठिकाणी काम सुरू असल्याने या ठिकाणी प्रचंड धुळेचे साम्राज्य पसरले असून धुळीमुळे वाहनचालकांसह नागरिकांना धुळीचा मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. पावसाळा संपताच वाहनांची मोठ्या प्रमाणात वर्दळ सुरु असल्याने, रस्त्यांवरील धुरळा अधिक प्रमाणात वाढला आहे.
मुंबई-गोवा महामार्गाचे काँक्रीटीकरणाचे कामामुळे महामार्गावर सध्या धुळीचे साम्राज्य पसरले आहे. धुळीचा त्रास होऊ नये म्हणून सबंधित ठेकेदारकडून पाण्याची फवारणी नित्यनियमाने करणे अत्यावश्यक असताना त्याकडे दुर्लक्ष केले जात असल्यानेच रस्त्यावरील धुरळा वाहनचालकासह जनतेच्या नाकातोंडात जात असून याचा विपरीत असा दुष्परीनाम जनतेला भोगावा लागणार आहे. कारण नकाद्वारे आणि तोंडाद्वारे शरीरात धुरळा जाऊन विविध आजार बाळवण्याची शक्यता असते.हे नाकारून चालणार नाही.
मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरणाचे काम गेले १७ वर्षांपासून सुरू आहे.पावसाळ्यात थांबलेले काम पुन्हा गणेशोत्सवानंतर कुर्मगतीने का असेना महामार्गाचे काम सुरू असून या कामात कोणतेही नियोजन दिसून येत नाही. मुंबई-गोवा महामार्गावर बावननदी ते आरवली पर्यंत रस्ता कॉक्रीटीकरण, उड्डाण पूल, छोटे मोठे ब्रिज, गटाराचे आदी काम विविध ठिकाणी सुरू आहे. असे असताना हे काम डिसेंबर २०२४ पर्यंत पूर्ण होईल, याची खात्री देता येणार नसल्याचे जनतेतून बोलले जात आहे.
या मार्गांवर तसेच संगमेश्वर येथील रस्त्यावर प्रचंड धुळीचे साम्राज्य पसरले आहे. या धुळीमुळे प्रवासीवर्गाबरोबर स्थानिक व्यापारी व नागरिक कमालीचे त्रस्त झाले आहेत. तुफान वेगाने ये-जा करणाऱ्या वाहनांमुळे रस्त्यावरील धूळ जनतेच्या नाकातोंडात जात आहे. तसेच पसरलेली धूळ व्यावसायिकांच्या दुकानात जाऊन मोठे नुकसान होत आहे.
त्रासदायक व अपघाताला निमंत्रण देणाऱ्या धुळीला बसवण्यासाठी नियमित पाण्याची फवारणी करणे आवश्यक असताना तसे न करता क्वचितच वरच्यावर तेही ठराविक ठिकाणीच पाणी फवारणी केली जाते. त्यामुळे पुन्हा तीच धूळखाव परिस्थितीचा सामना जनतेला करावा लागत आहे. त्यामुळे योग्य नियोजनानुसार सबंधित ठेकेदाराकडून धुळीवर उपाययोजना करण्याची मागणी वाहन चालकांसह नागरिकांकडून केली जात असतानाच सदरची वृत्त प्रसारित करूनसुद्धा ठेकेदार कंपनी कडून जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात येत असल्याने वाहनचालकांसह जनतेतून तीव्र संतापा व्यक्त केला जात असून याची दखल सबंधित बांधकाम विभागाने घेऊन सबंधित ठेकेदाराला सूचना कराव्या अन्यथा पुढील होणाऱ्या दुष्परीणामांना सबंधित विभाग व ठेकेदाराला जबाबदार ठेऊन आक्रमक पवित्रा घेण्याची तयारी स्थानिकांनी घेतली आहे.