( रत्नागिरी )
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० अंतर्गत शिक्षणाच्या विविध स्तरावर विद्यार्थी प्रगतीसाठी पंचायत समिती रत्नागिरी व केंद्र करबुडे यांच्या संयुक्त विद्यमाने शाळा करबुडे रामगडे पाचकुडे येथे शिक्षण सप्ताह २०२४ चा दुसऱ्या दिवशी मूलभूत संख्याज्ञान व साक्षरता दिवस उत्साहात साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमाला कासार (प्राथमिक शिक्षणाधिकारी) किरण लोहार (शिक्षणाधिकारी योजना) रविंद्र कांबळे (कार्यक्रम अधिकारी जि.प. रत्नागिरी) सुनिल पाटील (गट शिक्षणाधिकारी रत्नागिरी) पाचकुडे मॅडम (सरपंच करबुडे) डाॅ .सोपनूर (शिक्षणविस्तार अधिकारी बीट हातखंबा) अरुण जाधव (केंद्रप्रमुख करबुडे), संगिता सावंत मॅडम (विषयतज्ञ पं.सं. रत्नागिरी )यांची प्रमुख उपस्थिती होती. शैक्षणिक साहित्य प्रदर्शनाचे उद्घाटन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. प्रास्ताविक केंद्रप्रमुख अरुण जाधव यांनी केले. उपस्थित मान्यवरांचे स्वागत व सत्कार मुख्याध्यापक राऊत यांच्या हस्ते करण्यात आले.
शिक्षणाविषयी जाणीव जागृती निर्माण करण्यासाठी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी निपुण प्रतिज्ञा घेण्यात आली. शैक्षणिक साहित्य प्रदर्शनाचे आयोजन व सादरीकरण करण्यात आले. गणितीय खेळांचे प्रात्यक्षिक घेण्यात आले. भौमितिक आकारयुक्त रांगोळी प्रदर्शन भरविण्यात आले होते. यावेळी कासार व लोहार यांनी मूलभूत संख्याज्ञान व साक्षरता दिवसाचे महत्व व संपूर्ण सप्ताहाच्या उपक्रमाबाबत विशेष मार्गदर्शन केले. यावेळी करबुडे बौध्दवाडीच्या विद्यार्थ्यांनी अंकाचे गाणे साभिनय सादर केले.
यावेळी रविंद्र कांबळे, सुनिल पाटील, पाचकुडे मॅडम, डाॅ.दत्तत्रय सोपनूर, संगिता सावंत मॅडम, अरुण जाधव, मुख्याध्यापक राऊत, विष्णू सागवेकर, खरात मॅडम, दिपक घाटविलकर, प्रदिप जाधव, संजय सुवरे, वैष्णवी कुबडे, सुनिल वासावे,विद्याधर कांबळे, शैलेश शिंदे, सुशिल जाधव, पालक, ग्रामस्थ बंधू भगिनी आणि विद्यार्थी उपस्थित होते.
अंकाचे गाणे सादर केल्याबद्दल मार्गदर्शक खरात मॅडम, सुशिल जाधव सर व विद्यार्थ्यांचे शिक्षणाधिकारी यांनी विशेष अभिनंदन केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील व केंद्रातील मुख्याध्यापक व शिक्षक यांनी विशेष परिश्रम घेतले. या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय सुवरे व आभार विद्याधर कांबळे यांनी मानले.