(देवरूख / सुरेश सप्रे)
यूनाइटेड फोरम ऑफ बँक युनियन्सच्या सर्क्युलर नं. UFBU/2025/01 दिनांक 07 फेब्रुवारी 2025 च्या प्रमाणे UFBU चा संपूर्ण देशभर 24 आणि 25 मार्च 2024 बँक संप पुकारण्यात आला आहे. या कालावधीत दरम्यान दि. 3 मार्च 2024 ला संसदेपुढे धरणे तसेच वेगवेगळ्या दिवशी जिल्हा व शाखानिहाय निदर्शने, ब्लॅक बॅच लावणे, द्विटर कॅम्पेन, रॅली, अश्या विविध प्रकारची आंदोलने करण्याचे वेळापत्रक जाहीर केले आहे.
प्रमुख मागण्या पुढील प्रमाणे:
1) सर्व श्रेणींमध्ये पुरेशी भरती करा, 2) सर्व तात्पुरत्या कर्मचाऱ्यांचे नियमितीकरण करा, 3) बँकिंग क्षेत्रात ५ दिवसांचा कार्य सप्ताह लागू करा, 4) नोकरीची सुरक्षा सुनिश्चित करा, 5) DFS च्या परफॉर्मन्स रिव्ह्यूविषयीच्या निर्देशांना मागे घ्या, 6) DFS च्या PLI निर्देशांना मागे घ्या, 7) बँक कर्मचाऱ्यांचे रक्षण करा, सुरक्षितता द्या, 8) हल्ले व गैरवर्तन थांबवा. बँक अधिकाऱ्यांसाठी आणि कर्मचाऱ्यांसाठी सुरक्षित कार्यस्थळे निर्माण करा 9) PSB मध्ये कामगार/अधिकारी संचालकांच्या रिक्त जागा भरा, 10) IBA कडे प्रलंबित असलेल्या उर्वरित प्रश्नांचे निराकरण करा, 11) ग्रॅच्युइटी मर्यादा ₹२५ लाखांपर्यंत वाढवा आणि ती सरकारी कर्मचाऱ्यांच्या समकक्ष करमुक्त करा, 12) कर्मचारी कल्याणावर अन्यायकारक कर थांबवा. सवलतीच्या लाभांवर प्राप्तिकर कपात रद्द करा – व्यवस्थापनाने खर्च उचलावा, 13) राष्ट्रीय हित जपण्यासाठी IDBI बँकेत ५१% सरकारी हिस्सा कायम ठेवा
विरोध पुढील गोष्टींसाठी आहे:
1) PSB च्या धोरणात्मक बाबतीत DFS द्वारे होत असलेल्या मायक्रो मॅनेजमेंटला विरोध, 2) कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या सेवा अटींवर परिणाम करणारे, द्विपक्षीयतेला कमकुवत करणारे हस्तक्षेप, 3)बँकांमध्ये कायमस्वरूपी नोकऱ्या आउटसोर्स करणे, 4) बँकिंग क्षेत्रातील अन्यायकारक कामगार पद्धती.
शुक्रवार दिनांक 21 फेब्रुवारी 2025 रोजी सायंकाळी ठीक 5.30 वाजता बँक ऑफ इंडिया झोनल ऑफिस रत्नागिरी येथे UFBU तर्फे आपला निषेध व्यक्त करण्यासाठी “निदर्शने” आयोजित करण्यात आली. या निदर्शनास रत्नागिरी शहरातील सर्व बँकांमधील व नजीकच्या सर्व शाखांमधील अधिकारी व कर्मचारी हे बहुसंख्येने उपस्थित होते.
याचे नेतृत्व महाराष्ट्र स्टेट बँक एम्प्लॉईज फेडरेशनचे जॉईंट सेक्रेटरी कॉ. विनोद कदम, बँक ऑफ इंडिया अधिकारी संघटनेचे कॉ. किरण खोपडे, कॉ. रोहित सुर्वे, बँक ऑफ महाराष्ट्र बँकेच्या कर्मचारी संघटनेचे कॉ. भागेश खरे, बँक ऑफ इंडिया बँकेच्या संघटनेचे कॉ. मनोज लिंगायत यांनी केले.