(रत्नागिरी)
शहराजवळील बजाज फायनान्स कंपनीमध्ये जोरदार राडा झाल्याची घटना समोर आली आहे. हा राड्याचा सर्व प्रकार शुक्रवारी सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास घडला. तत्काळ पोलीस घटनास्थळी पोहोचले व दारूच्या नशेत असणाऱ्या वसुली अधिकाऱ्याला पोलीस स्थानकात घेऊन गेले अशी माहिती घटनास्थळावरून मिळाली.
राजिवडा येथील एक ग्राहक संबंधित फायनान्स कंपनीमध्ये एनओसी घेण्यासाठी कार्यालयात आला होता. याचवेळी फायनान्स कंपनीच्या कार्यालयात कर्मचाऱ्याचा जोरदार राडा सुरू होता. फायनान्स कंपनीतील एक कर्मचारी कंपनीतील लॅपटॉपची तोडफोड करत असल्याचे या ग्राहकाच्या निदर्शनाला आले. शिवीगाळ व तोडफोड करणारा कर्मचारी दारूच्या नशेत जोरजोराने शिवीगाळ देखील करत होता. यामुळे एका ग्राहकाने काही पाऊले पुढे जाऊन पाहिल्यावर दारूच्या नशेत असणाऱ्या या कर्मचाऱ्याने राजिवडा येथील ग्राहकाच्या अंगावर धावून आला. नशेतील त्या कर्मचाऱ्याने ग्राहकाला मारहाण करण्यास सुरुवात केली. यानंतर संबंधित ग्राहक कार्यालयातून बाहेर पडले. यावेळी नशेतील त्या कर्मचाऱ्याने त्यांचा पाठलाग करत कार्यालयाच्या खाली देखील त्यांना मारहाण केली. यानंतर ग्राहकाने तक्रार दाखल करण्यासाठी पोलीस स्थानकात धाव घेतली.
नियामत पावसकर राजिवडा रत्नागिरी येथील नागरिक असून तो एका बँकेतून कर्ज काढण्यासाठी गेला होता. सदर बँकेने बजाज फायनान्स मधून एन ओ सी पत्र आणावयास सांगितले. त्यानुसार नियामत पावसकर हे बजाज फायनान्स रत्नागिरी या कार्यालयात गेले, तेथे एन.ओ.सी घेत असताना तेथील शिरधनकर नामक वसुली अधिकारी हा दारु प्यायलेल्या अवस्थेत होता. त्याने कार्यालयातील लॅपटॉप व इतर वस्तुंची मोडतोड केली आणि नियामत पावसकर याला मारहाण केली. नियामत पावसकर हे कार्यालयाच्या ग्राउंड फ्लोअरवर आले असता हा शिरधनकर देखील पुन्हा त्यांच्या मागून खाली आला येऊन तेथेही मारहाण केली. याबाबत तक्रार दाखल करण्यासाठी संबंधित ग्राहकाने शहर पोलिस स्थानकात धाव घेतली आहे. अखेर या प्रकरणी मद्यप्राशन करून मारहाण केल्याप्रकरणी शिरधनकर याच्या विरोधात शहर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. तसेच गुन्हा देखील दाखल झाला आहे.