(चिपळूण)
महाराष्ट्र शासन शिक्षण विभागाच्या राज्य शैक्षणिक संशोधन परिषद व भारत सरकार यांनी आयोजित केलेल्या राज्यस्तरीय शैक्षणिक व्हिडिओ निर्मिती स्पर्धेत माध्यमिक भाषा विभागात रत्नागिरी जिल्ह्यातील सह्याद्री शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनी कॉलेज खेर्डी चिंचघरी सती विदयालयाचे तंत्रस्नेही शिक्षक श्री.योगेश चंद्रकांत नाचणकर यांना पुरस्कार प्राप्त झाला आहे. रविवार दिनांक 29 सप्टेंबर 2024 रोजी महात्मा फुले सभागृह राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे या ठिकाणी आयोजित बक्षीस वितरण समारंभ कार्यक्रमात ना. श्री. दिपक केसरकर (मंत्री, शालेय शिक्षण व मराठी भाषा, महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री, मुंबई शहर), आय. ए. कुंदन (भा.प्र.से.) (प्रधान सचिव, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, महाराष्ट्र राज्य.), सौ.अर्चना अवस्थी-सहसचिव (शालेय शिक्षण भारत सरकार)आर विमला, श्री. सूरज मांढरे (भा.प्र.से.)(आयुक्त (शिक्षण), महाराष्ट्र राज्य, पुणे)., आर. विमला (भा.प्र.से.) (राज्य प्रकल्प संचालक, महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद, मुंबई.), श्री. राहूल रेखावार (भा.प्र.से.) संचालक, (राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिष्द, महाराष्ट्र, पुणे) श्री सोनवणे आय टी विभाग प्रमुख scert pune या उपस्थित मान्यवरांच्या हस्ते आकर्षक सन्मानचिन्ह, सिल्वर मेडल, सन्मानपत्र, 40000 रू देऊन सन्मानित करण्यात आले.
यापूर्वीही श्री.नाचणकर यांना इंटरनॅशनल प्राईम अवार्ड 2022, राष्ट्रीय रत्न पुरस्कार 2023, राज्यस्तरीय सावित्रीज्योती पुरस्कार, शिक्षक ध्येयाचा कर्तुत्ववान शिक्षक पुरस्कार, सर फाउंडेशनचा नॅशनल एज्युकेशन इनोव्हेशन अवॉर्ड, ई विविध पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे त्यांच्या या यशाबद्दल सह्याद्री शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष,आमदार श्री. शेखरजी निकम, संस्थेचे अध्यक्ष श्री.बाबासाहेब भुवड, संस्थेचे सेक्रेटरी श्री.महेश महाडिक, संस्थेचे जेष्ठ संचालक श्री.शांताराम खानविलकर, संस्थेचे सर्व पदाधिकारी, विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री.संजय वरेकर, उपमुख्याध्यापक श्री.विश्वास दाभोळकर, पर्यवेक्षक श्री.पांडुरंग पाटील, सौ.आसावरी राजेशिर्के, सर्व शिक्षक,शिक्षकेत्तर कर्मचारी, व सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.