CVV नंबरचा फुलफॉर्म आहे Card verification value. याचाच अर्थ हा व्हेरिफिकेशन नंबर असतो. यालाच कार्ड व्हेरिफिकेशन कोड पण म्हणतात.
CVV नंबरचे वैशिष्ट्य
तुमच्या क्रेडिट कार्ड किंवा डेबिट कार्डच्या मागच्या बाजुला मॅग्नेटिक स्ट्रिपच्या जवळ हा CVV नंबर दिसतो. मंडळी, या नंबरचे महत्वाचे वैशिष्ट्य म्हणजे हा नंबर सहसा कुठेच सेव्ह होत नाही. तुम्ही बऱ्याचवेळा बघितले असेल की ऑनलाइन ट्रांझॅक्शनच्या वेळी तुमच्या कार्डचे डिटेल्स आपोआप सेव्ह होतात आणि जेव्हा पुढच्या वेळी तुम्ही पेमेंट करता तेव्हा तुम्हाला परत सगळे डिटेल्स टाकावे लागत नाही. पण तेव्हाही तुम्हाला CVV नंबर टाकावा लागतो. कारण CVV नंबर कुठेच सेव्ह होत नाही.
CVV नंबर कार्डच्या मागे का लिहिलेला असतो.
मंडळी, सध्या टेक्नोलॉजी आणि डिजिटलायजेशनचा जमाना आहे. अशावेळी कार्डवरुन पेमेंट करताना ‘ओटीपी’च्या रूपात एका आणखी सुरक्षेचे कवच तुमच्याजवळ उपलब्ध असते. तरीसुद्धा शेवटी विषय पैशांचा आहे राव!! काळजी पण तशीच घेतली जायला हवी ना? मंडळी, जेव्हा तुम्ही ऑनलाइन पेमेंट करत असता तेव्हा CVV नंबर कार्डच्या मागच्या बाजूला लिहिला असल्याने तो कुणाला दिसत नाही. हे त्याचे कारण आहे. आणि काही तज्ञ तर असाही सल्ला देतात की CVV नंबर पाठ करावा, सेफ्टीसाठी कुठेतरी लिहून ठेवावा आणि कार्डवरील नंबर पुसून टाकावा जेणेकरून तो नंबर फक्त तुम्हालाच माहित असेल.
डेटा चोरीपासून संरक्षण
मंडळी CVV नंबर डेटा चोरीसारख्या मोठ्या समस्येपासून वाचण्यासाठी तुमची मदत करतो. बँकिंग रेगुलेशन्सनुसार कोणतेच मशीन CVV नंबर सेव्ह करु शकत नाही. जर एखाद्याने तुमची सगळी माहिती चोरी केली तरी CVV नंबर अभावी तो तुमचे काहीच नुकसान करू शकत नाही.
कार्डमागे लिहिलेला CVV नंबर किती महत्त्वाचा असतो ते लक्षात घ्या. तुमचा CVVनंबर कुणाला सांगू नका, तुमचा मित्रपरिवार आणि इतर संबंधी लोक ही चूक करु नयेत म्हणून त्यांनाही हे आवर्जून सांगा.