(संगमेश्वर)
पंचायत समिती संगमेश्वर अंतर्गत कोळंबे प्रभागाच्या हिवाळी क्रीडास्पर्धा मांजरे क्रीडानगरीत मोठ्या उत्साहाने पार पडल्या. विद्यार्थ्यांनी सांघिक व वैयक्तिक प्रकारांत आपल्या क्रीडाकौशल्याचे प्रदर्शन करत उपस्थित पालक व क्रीडारसिकांचे मनोरंजन केले व शाबासकीची थाप मिळवली. संपूर्ण स्पर्धांचे नियोजन करताना कोळंबे प्रभागातील कोंड्ये, आंबेड बु., डिंगणी व कुरधुंडा केंद्रातील शिक्षक तसेच मांजरे गावचे ग्रामस्थ यांच्या एकत्रितपणे सहकार्य भावनेने केलेल्या कार्यामुळे स्पर्धा निकोप व यशस्वी झाल्या.
स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे:
वैयक्तिक अंतिम निकाल – लहान गट (मुलगे)
५० मी. धावणे –
विजेता – विघ्नेश संदीप सालीम (वांद्री कुणबीवाडी शाळा)
उपविजेता – श्रेयश मंगेश सालीम (वांद्री कुणबीवाडी शाळा)
उंच उडी –
विजेता – संदेश सुनील जाधव (उपळे शाळा)
उपविजेता – विघ्नेश संदीप सालीम (वांद्री कुणबीवाडी शाळा)
लांब उडी –
विजेता – प्रज्वल प्रदीप भरणकर (कोळंबे नं. २ शाळा)
उपविजेता – समित सुधाकर वेद्रे (परचुरी नं. २ शाळा)
गोळा फेक –
विजेता – प्रणय प्रवीण धुमक (कुरधुंडा गुरववाडी शाळा)
उपविजेता – प्रज्ञेश निलेश लोंढे (देण शाळा)
थाळी फेक –
विजेता – प्रणय प्रवीण धुमक (कुरधुंडा गुरववाडी शाळा)
उपविजेता – विघ्नेश निलेश जांभळे (पिरंदवणे नं. १ शाळा)
वैयक्तिक अंतिम निकाल – लहान गट (मुली)
५० मी. धावणे –
विजेता – आरोही प्रमोद शिंदे (फुणगूस मराठी शाळा)
उपविजेता – तन्वी अविनाश भेकरे (देण शाळा)
लांब उडी –
विजेता – कल्याणी मनोज शिगवण (आंबेड बु. नं. ४ शाळा)
उपविजेता – अवनी मंगेश पेडामकर (करजुवे नं. ४ शाळा)
उंच उडी –
विजेता – अवनी संकेश पेजे (कुरधुंडा गुरववाडी शाळा)
उपविजेता – तन्वी अविनाश भेकरे (देण शाळा)
थाळी फेक –
विजेता – हर्षिता सुभाष देसाई (आंबेड बु. नं. २ शाळा)
उपविजेता – विशाखा संदीप भोसले (मानसकोंड शाळा)
वैयक्तिक अंतिम निकाल – मोठा गट (मुलगे)
५० मी. धावणे –
विजेता – वेदांत मोहन मांजरेकर (वांद्री नं. १ शाळा)
उपविजेता – कुणाल अनिल निरुळकर (डिंगणी गुरववाडी शाळा)
लांब उडी –
विजेता – मिहीर मंगेश जाधव (कुरधुंडा गुरववाडी शाळा)
उपविजेता – वेदराज वैभव शिंदे (पोचरी शाळा)
उंच उडी –
विजेता – यश सचिन शिगवण (मानसकोंड शाळा)
उपविजेता – मिहीर मंगेश जाधव (कुरधुंडा गुरववाडी शाळा)
गोळा फेक –
विजेता – नितीराज मंगेश बोत्रे (डावखोल शाळा)
उपविजेता – साहिल योगेश चंदरकर (परचुरी नं. ३ शाळा)
थाळी फेक –
विजेता – सोहम मंगेश रहाटे (आंबेड बु. नं. १ शाळा)
उपविजेता – नितीराज मंगेश बोत्रे (डावखोल शाळा)
वैयक्तिक अंतिम निकाल – लहान गट (मुली)
५० मी. धावणे –
विजेता – सोनाल अनिल शितप (कोंड्ये नं. २ शाळा)
उपविजेता – इशा विश्वास माटल (परचुरी नं. ३ शाळा)
लांब उडी –
विजेता – आदिती अनिल घाणेकर (मांजरे शाळा)
उपविजेता – वेदिका संदीप भोसले (मानसकोंड शाळा)
उंच उडी –
विजेता – आदिती अनिल घाणेकर (मांजरे शाळा)
उपविजेता – जागृती महेश सुर्वे (आंबेड बु. नं. २ शाळा)
थाळी फेक –
विजेता – काव्या चकोर कानर (आंबेड बु. नं. २ शाळा)
उपविजेता – साक्षी सुनील वेल्ये (पोचरी शाळा)
या स्पर्धांसोबत झालेल्या सांघिक स्पर्धांचा अंतिम निकाल पुढीलप्रमाणे:
सांघिक स्पर्धा – लहान गट
कबड्डी मुलगे –
विजेता – कोंड्ये केंद्र
उपविजेता – आंबेड बु. केंद्र
कबड्डी मुली –
विजेता – कोंड्ये केंद्र
उपविजेता – डिंगणी केंद्र
खो-खो मुलगे –
विजेता – आंबेड बु. केंद्र
उपविजेता – कुरधुंडा केंद्र
खो-खो मुली –
विजेता – आंबेड बु. केंद्र
उपविजेता – कुरधुंडा केंद्र
लंगडी मुली –
विजेता – कोंड्ये केंद्र
उपविजेता – आंबेड बु. केंद्र
सांघिक स्पर्धा – मोठा गट
कबड्डी मुलगे –
विजेता – आंबेड बु. केंद्र
उपविजेता – कोंड्ये केंद्र
कबड्डी मुली –
विजेता – आंबेड बु. केंद्र
उपविजेता – कुरधुंडा केंद्र
खो-खो मुलगे –
विजेता – आंबेड बु. केंद्र
उपविजेता – कुरधुंडा केंद्र
खो-खो मुली –
विजेता – आंबेड बु. केंद्र
उपविजेता – कोंड्ये केंद्र
लंगडी मुली –
विजेता – कोंड्ये केंद्र
उपविजेता – आंबेड बु. केंद्र
याच मैदानावर खेळवण्यात आलेल्या ओव्हरआर्म क्रिकेट स्पर्धांमध्ये अंतिम लढतीत कोंड्ये केंद्राच्या संघाने नेत्रदीपक कामगिरी करत आंबेड बु. केंद्राच्या संघाला मात देत क्रिकेटच्या चषकावरही आपले नाव कोरले. संपूर्ण स्पर्धांमध्ये वैयक्तिक व सांघिक कामगिरी करत प्रत्येक खेळावर आपली छाप सोडणाऱ्या आंबेड बु. केंद्राच्या संघाला यावर्षीचे कोळंबे प्रभागस्तरीय विजेतेपद बहाल करत झळाळता चषक मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
कोळंबे प्रभागाचे शिक्षण विस्तार अधिकारी मा. श्री. शशिकांत त्रिभुवणे साहेब, कोंड्ये व डिंगणी केंद्राचे केंद्रप्रमुख श्री. संतोष मोहिते सर, कुरधुंडा उर्दू व आंबेड केंद्रांच्या केंद्रप्रमुख सौ. मिनाक्षी नाचणकर मॅडम, मांजरे गावचे सरपंच श्री. सचिन मांजरेकर, उपसरपंच श्री. प्रदीप कुलये, युवा नेते श्री. प्रतिक देसाई, मांजरे नं. १ च्या मुख्याध्यापक सौ. रसिका मोरये, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य व ग्रामस्थ, तसेच प्रभागातील सर्व मुख्याध्यापक, शिक्षक, क्रीडाप्रेमी पालक बंधू-भगिनी यावेळी उपस्थित होते.