(रत्नागिरी)
गोवा शिपयार्डने भारतीय नौदलासाठी तयार केलेल्या महाकाय शिपचे जलावरण आज गोव्याचे राज्यपाल मा. श्रीधर पिल्लयी यांच्या प्रमुख उपस्थितीत व ॲड श्रीमती रिता श्रीधरन यांच्या हस्ते एका शानदार सोहळ्यात पार पडले. या कार्यक्रमास गोवा शिपयार्ड चे स्वतंत्र संचालक या नात्याने गेस्ट उपस्थित राहण्याचा सन्मान ॲड. दीपक पटवर्धन यांना मिळाला.
सदर जलावरण कार्यक्रम अत्यंत शानदार व दिमाखदार झाला. गोवा शिपयार्डचे अधिकारी, नेव्हीचे अधिकारी यांच्या समवेत गोवा शिपयार्डचे अध्यक्ष ब्रिजेश, उपाध्याय, संचालक श्री. जगमोहन, दुसरे संचालक श्री. बागी यांचेसह श्री. पटवर्धन उपस्थित होते. यावेळी हिंदू धर्मशास्त्र पद्धतीनुसार शिपचे पुजन करण्यात आले आणि क्रेन आणि नवतंत्रज्ञान जेटीच्या माध्यमातून शिपला पाण्याचा पहिला स्पर्श झाला.
या महाकाय शिपच नाव “त्रिपुट” ठेवण्यात आल आहे. त्रिपुट शिप रशियाच्या मदतीने गोवा शिपयार्ड येथे तयार होत आहे. अनेक क्षेपणास्त्रे, रडार तसेच विमानतळ उपलब्ध असणारे हे अत्याधूनिक महाकाय शिप नेव्हीसाठी तयार केले जात आहे.
या शिपमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या धोरणास अनुरून आत्मनिर्भर भारत या संकल्पनेनुसार ५५ % काम देशांतर्गत निर्माण केलेल्या साधनांचा वापर करून करण्यात येत आहे. त्रिपुट चे नामकरण झाल्यानंतर शिपवर भारताचा तिरंगा फडकवण्यात आला व तिरंग्याला मानवंदना देण्यात आली.
देशाच्या संरक्षण क्षेत्रातला सहाय्यभूत ठरणाऱ्या या जलावरण समारंभाला उपस्थित राहण्याची संधी मिळाली. अत्यंत रोमांचकारी असा हा सोहळा होता, असे पटवर्धन यांनी सांगितले. गेली ३ वर्ष गोवा शिपयार्डचे काम करत असताना या शिप संदर्भात अनेक निर्णय करण्याच्या प्रक्रियेत मला सहभागी होता आले. ही बाब माझ्यासाठी अभिमानाची आहे, अशी माहिती गोवा शिपयार्ड चे स्वतंत्र संचालक अँड.दीपक पटवर्धन यांनी यावेळी दिली.