(गणपतीपुळे / वैभव पवार)
महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने संपूर्ण महाराष्ट्रातील सुमारे 30 पर्यटक निवासांचे खाजगीकरण करण्याचा निर्णय घेतला असून या विरोधात महाराष्ट्रातील प्रत्येक पर्यटक निवासामध्ये काळी फित लावून खाजगीकरणाविरोधात निषेध व्यक्त करून आंदोलन केले जात आहे. सदर आंदोलन पर्यटन विकास कर्मचारी संघाचे अध्यक्ष सचिनभाऊ अहिर व सरचिटणीस अशोक खामकर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
गणपतीपुळे हे जागतिक पर्यटन व धार्मिक स्थळ म्हणून प्रसिद्ध आहे. येथील पर्यटन निवास गणपतीपुळे ते संपूर्ण महाराष्ट्रातील सर्वात जास्त उत्पन्न मिळवून देणारे पर्यटन निवास आहे. याचे देखील खाजगीकरण करण्यात येणार असून याच्या विरोधात पर्यटन निवास गणपतीपुळे येथील कर्मचारी दिनांक 28 सप्टेंबर 2024 पासून दररोज सकाळी कामावर हजर होण्यापूर्वी गेट वरती काळी फीत लावून खाजगीकरणाविरोधात घोषणा देऊन निषेध व्यक्त केला जात आहे. परंतु पर्यटन निवास गणपतीपुळे येथील आलेल्या पर्यटकाला कोणताही त्रास होणार नाही त्याची दक्षता देखील घेतली जात आहे. काळी फित लावून आंदोलन झाल्यानंतर आपापल्या कामावर जाऊन कामे केली जात आहेत.
महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या होणाऱ्या खाजगी करणारा येथील ग्रामस्थ व पर्यटन व्यावसायिक संघटना यांनी देखील तीव्र विरोध दर्शवला आहे. येथील ग्रामस्थ ग्रामपंचायत गणपतीपुळे मार्फत तसेच पर्यटन व्यवसाय संघटना यांच्या वतीने वरिष्ठ प्रादेशिक व्यवस्थापक रत्नागिरी तसेच व्यवस्थापकीय संचालक मुंबई व पर्यटन मंत्री गिरीश महाजन यांना निवेदन देणार असल्याचे सांगितले.