(गणपतीपुळे / वैभव पवार)
रत्नागिरी तालुक्यातील आगरनरळ गावचे सुपुत्र, ज्ञान मंदिर विद्यालय आगरनरळचे माजी विद्यार्थी तसेच न्यू इंग्लिश स्कूल सैतवडेचे कलाशिक्षक चित्रकार रमेश गंधेरे यांनी स्वतः काढलेल्या चित्रांची निवड ६४ वे महाराष्ट्र राज्य कला प्रदर्शन २०२४-२५ साठी करण्यात आली आहे.
गरीब परिस्थितीत ग्रामीण भागात शिक्षण घेऊन अथक मेहनतीच्या बळावर गंधेरे सर यांची अनेक चित्र प्रदर्शनात सहभागी होत असतात. त्यांनी जल रंगातून साकारलेली व रेखाटलेली चित्रे वाखाणण्याजोगी असतात.
कला संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांनी सन 2024-25 करिता रेखा व रंगकला विभागात महाराष्ट्र राज्य कला प्रदर्शनासाठी त्यांच्या कलाकृतींची निवड केलीआहे. ही निवड झाल्याबद्दल अखिल जयगड खाडी भोई समाज सेवा संघ जिल्हा रत्नागिरीचे पदाधिकारी सल्लागार आणि महिला कमिटी यांनी त्यांचे विशेष अभिनंदन केले आहे.