(दापोली)
दापोली खेड रस्त्यावर वाकवली उन्हवरे फाटा या ठिकाणी शुक्रवारी १४ फेब्रुवारी रोजी सायंकाळी सव्वा सहा वाजण्याच्या सुमारास उभ्या असलेल्या एसटी बसला आराम बसने मागून धडक दिल्यामुळे अपघात झाल्याची घटना घडली आहे.
याबाबतीत मिळालेल्या माहितीनुसार, पांगारी दापोली ही एसटी बस वाकवली उन्हवरे फाटा या ठिकाणी दापोलीकडे जात असताना प्रवाशांना चढ-उतार करण्याकरता थांबली होती. याचवेळी दापोली कडून खेडकडून जाणाऱ्या आराम बस ने या उभ्या असलेल्या एसटी बसला जोराने धडक दिली. या अपघातात एसटी मधून प्रवास करणा-या ११ प्रवाशांपैकी एका प्रवाशाला किरकोळ दुखापत झाली आहे. या अपघातात एसटीचे सहा हजार रुपयांचे नुकसान झाले असून, खाजगी आराम बसचे मात्र सुमारे पंधरा हजार रुपयांचे नुकसान झाल्याचे पंचनाम्यानुसार सांगण्यात आले.
अपघात स्थळी दापोली एसटी आगार प्रमुख आर.ई.उबाळे आणि कार्यशाळा अधीक्षक एम.एम. राजापकर त्याचप्रमाणे दापोली पोलीस यांनी भेट देऊन पंचनामा केला. याबाबत पुढील तपास दापोली पोलीस करित आहेत.