(रत्नागिरी)
मंगळवारी (३१ डिसेंबर) दुपारच्या सुमारास रत्नागिरी शहरानजीक असणाऱ्या एमआयडीसी भागात दिवसाढवळ्या घडलेल्या चोरीच्या घटनेने एकच खळबळ उडाली होती. जे के फाईल्स जवळ राहणाऱ्या कल्पना भिसे यांच्या घरात पाच ते सहा महिलांनी घुसून त्यांच्या घरातील कपाटातून सोन्याचे दागिने लंपास केले होते. मंगळवारी दुपारच्या सुमारास ही घटना घडली होती.
पोलिसांकडे आलेल्या तक्रारीवरून रत्नागिरी ग्रामीण पोलिसांनी जलद गतीने तपासाची सूत्र फिरवून १२ तासाच्या आत संशयित आरोपी महिलांना गोवा येथून अटक केली आहे. पोलिसांच्या या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.