(रत्नागिरी / वार्ताहर)
भारतीय जनता पार्टी रत्नागिरी दक्षिण विभाग महिला मोर्चा जिल्हा उपाध्यक्षपदी सौ संजना उदय माने यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या बाबतचे नियुक्ती पत्र भाजप महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष सौ वर्षा परशुराम ढेकणे यांनी सुपूर्त केले आहे. यावेळी माजी कॅबिनेट मंत्री, रत्नागिरी सिंधुदुर्गचे खासदार नारायणराव राणे यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
सन 2026 या कालावधीपर्यंत अथवा पुढील नियुक्ती होईपर्यंत आपली नियुक्ती ग्राह्य धरण्यात येत आहे असे नियुक्ती पत्रात नमूद केले आहे. पक्षाची विचारधारा व ध्येय धोरणांच्या आधीन राहून पक्ष वाढीसाठी आपण यथाशक्ती प्रयत्न करावेत असेही पुढे नमूद करण्यात आले आहे. पक्षाने दिलेली जबाबदारी मी अतिशय विचारपूर्वक, जबाबदारीने आणि सर्वांना सोबत घेऊन पक्षवाढीसाठी मी प्रामाणिकपणे पार पडेल असे सौ. संजना उदय माने यांनी बोलताना सांगितले. तसेच प्रथम राष्ट्र, नंतर पक्ष आणि शेवटी स्वतः असा विचारही त्यांनी यावेळी बोलून दाखविला.