(गणपतीपुळे / वैभव पवार)
रत्नागिरी तालुक्यातील भगवतीनगर बौद्धवाडी येथील भारतीय बौद्ध महासभा गाव शाखेचे ज्येष्ठ सल्लागार तथा मुख्य मार्गदर्शक आणि फुले शाहू आंबेडकर चळवळीचे ज्येष्ठ अभ्यासक, वाचन संस्कृतीतील एक नामवंत व्यक्तिमत्व, पाली भाषेचे अभ्यासक, श्रामणेर आणि जेष्ठ बौद्धाचार्य नंदकुमार शिवराम यादव यांची रत्नागिरी तालुका भारतीय बौद्ध महासभेच्या तालुका संघटकपदी नव्याने नियुक्ती झाली आहे. या नियुक्ती बद्दल त्यांचा यथोचित सन्मान रत्नागिरी तालुका शाखा बौद्धजन पंचायत समितीचे अध्यक्ष प्रकाश पवार आणि त्यांचे सहकारी यांच्या ग्रुपच्या वतीने त्यांच्या निवासस्थानी जाऊन करण्यात आला.
यावेळी बौद्धजन पंचायत समिती तालुका शाखेचे अध्यक्ष प्रकाश रामचंद्र पवार यांचे समवेत जेष्ठ बौद्धाचार्य रविकांत पवार, बौद्धाचार्य राजकुमार जाधव, पत्रकार संतोष पवार पत्रकार वैभव पवार आदी मान्यवर उपस्थित होते.
नंदकुमार यादव यांनी आजपर्यंत धार्मिक आणि सामाजिक कार्यात मोठे योगदान दिले आहे .त्यांनी बौद्धाचार्य परीक्षेत संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रथम क्रमांक मिळवला होता. यापूर्वी त्यांनी रत्नागिरी तालुका भारतीय बौद्ध महासभेच्या संस्कार विभागात उल्लेखनीय काम केले आहे तसेच बावीस खेडी बौद्धजन संघ दीक्षाभूमी वाटद खंडाळा येथील संघटनेच्या चिटणीस पदावर त्यांनी एकेकाळ उल्लेखनीय काम केले होते गेले होते.त्यांचे विशेष म्हणजे धार्मिक व सामाजिक चळवळीतील प्रख्यात व्यक्तिमत्व, ज्यांनी धार्मिक चळवळीला मोठी गती दिली असे कळझोंडी येथील दिवंगत गोविंद गोजू पवार उर्फ तात्यांच्या सहवासात त्यांनी काम केले आहे. दिवंगत गोविंद गोजू पवार यांचे ते अत्यंत जवळचे निकटवर्तीय मानले जात.
मालगुंड येथील बळीराम परकर विद्यालयात प्रयोगशाळा सहाय्यक पदी नोकरी केल्यानंतर ते सेवानिवृत्त झाले. त्यांची शालेय जीवनापासून असलेली असलेली सामाजिक व धार्मिक क्षेत्रातील ओढ अद्याप ही कायम टिकून आहे. या सर्व बाबींची दखल घेऊन भारतीय बौद्ध महासभेने त्यांची तालुका संघटक पदी निवड केली आहे.
नंदकुमार यादव हे वाचन चळवळीतील अभ्यासक मानले जातात. त्यांना एक व्यासंगी व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जाते. त्यांच्या या निवडीबद्दल धार्मिक व सामाजिक कामकाजाला मोठी गती येईल असा आशावाद भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा रत्नागिरीच्या प्रमुख कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे. या निवडीबद्दल त्यांचे सर्व स्तरातून विशेष अभिनंदन होत आहे.