( संगमेश्वर / मकरंद सुर्वे )
संगमेश्वर तालुक्यातील कडवई ग्रामपंचायत हॉल येथे उप प्रादेशिक परिवहन कार्यालय रत्नागिरी यांच्या वतीने रिक्षा मालक चालक संघटना(रजि) कडवई तुरळ चिखलीच्या सदस्यांना रस्ते सुरक्षा अभियान २०२४ च्या अनुषंगाने रस्ते अपघात व सुरक्षा याबाबत मार्गदर्शन करण्यात आले .यावेळी धर्मवीर आनंद दिघे साहेब महाराष्ट्र ऑटो रिक्षा आणि मिटर्ड टॅक्सी चालक कल्याणकारी मंडळाच्या सदस्यत्वाचे अर्ज वितरित करण्यात आले.
कडवई येथील ग्रामपंचायत हॉल येथे रिक्षा मालक चालक संघटना( रजि) कडवई तुरळ चिखली च्या सदस्यांना उपप्रादेशिक परिवहन अधिकारी रत्नागिरी यांच्यावतीने रस्ते अपघात व सुरक्षा व कल्याणकारी मंडळ याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी मोटर वाहन निरीक्षक ऋषिकेश कोराणे, सहायक मोटर वाहन निरीक्षक सुशांत पाटील, मोहसीन आवटी, अवधूत कुंभार हे उपस्थित होते.
सुरवातीला रिक्षा संघटनेच्या वतीने उपस्थित अधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. यानंतर मोटर वाहन निरीक्षक ऋषिकेश कोराणे यांनी रस्ते सुरक्षा अपघात व रिक्षा व्यवसाईकांची कर्तव्य याबाबत मार्गदर्शन केले. तसेच धर्मवीर आनंद दिघेसाहेब महाराष्ट्र ऑटो रिक्षा आणि मिटर्ड टॅक्सी चालक कल्याणकारी मंडळाबाबत सविस्तर माहिती दिली. यावेळी ६० रिक्षा व्यवसाईकांनी कल्याणकारी मंडळाच्या सदस्यत्वाचे अर्ज भरले.
अध्यक्ष मिलिंद चव्हाण यांनी संघटनेबाबत सविस्तर माहिती अधिकाऱ्यांना दिली व उपस्थितांचे आभार मानले. यावेळी व्यासपीठावर उपाध्यक्ष संदीप चिले कडवई उपसरपंच दत्ताराम ओकटे व सर्व सदस्य उपस्थित होते.
फोटो : रिक्षा व्यवसायिकांना अर्जाचे वितरण करताना मोटर वाहन निरीक्षक ऋषिकेश कोराणे, आणि परिवहन विभागाचे सहायक मोटर वाहन निरीक्षक व रिक्षा व्यवसाईक