(दापोली)
दापोली तालुका शिक्षण विभागामार्फत शैक्षणिक वर्ष २०२३-२४मध्ये निपूण भारत सह, मुलांच्या सर्वांगिण विकासासाठी राबविणेत येत असलेला व्हिजन दापोली या उपक्रमाद्वारे तालुक्यात शाळांमधून होत असलेला सकारात्मक बदल, गुणवत्ता वाढ, नासा-इस्त्रो अभ्यासदौरा परीक्षा, शिष्यवृत्ती परीक्षेतील यशस्वी नियोजन व कार्यवाही यामुळे ग्रामीण भागातून तळागाळातील सर्वसामान्यांच्या विद्यार्थ्यांची गुणवत्तापूर्ण यशस्वी कामगिरी आदिंची दखल घेत महाराष्ट्र राज्य मान्यताप्राप्त जनकल्याण संस्था कोल्हापूर यांचेमार्फत पं.स.दापोलीचे गटशिक्षणाधिकारी अण्णासाहेब बळवंतराव यांचा राज्यस्तरीय उत्कृष्ठ गटशिक्षणाधिकारी पुरस्कार पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे माजी अध्यक्ष महेश जाधव, ह.भ.प.भगवान कोकरे, अध्यक्ष उदयसिंह पाटील आदिंचे हस्ते कोल्हापूर येथे नुकताच प्रदान करणेत आला. त्याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
सदर पुरस्काराचे सर्व श्रेय व हा सन्मान एकट्याचा माझा नसून वर्षभर मेहनत घेतलेले तालुक्यातील सर्व शिक्षक, मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख, विस्तार अधिकारी, कर्मचारी सर्व पालक यांचा असल्याचे बळवंतराव यांनी सांगितले.