(मुंबई)
महिला व बाल विकास विभागाअंतर्गत भरती जाहीर करण्यात आली आहे. एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत गट क संवर्गातील सरळसेवा भरतीसाठी अर्ज मागवण्यात येत आहे. १४ ऑक्टोबरपासून या नोकरीसाठी अर्जप्रक्रिया सुरु झाली आहे. एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत गट क संवर्गातील मुख्यसेविका पदासाठी सरळसेवा भरतीसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती बाबत तपशील पुढील प्रमाणे
संस्था – महिला व बाल विकास विभाग
भरले जाणारे पद – अंगणवाडी मुख्यसेविका/अंगणवाडी सुपरवायजर / पर्यवेक्षिका
एकूण रिक्त पदे – १०२ रिक्त पदांसाठी ही भरती असणार आहे.
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाइन
पगार – या नोकरीसाठी निवड झालेल्या उमेदवारांना ३५,४०० ते १,१२,४०० रुपये वेतन मिळणार आहे.
वयोमर्यादा – २१ ते ३८ वर्षे.
अर्ज शुल्क –
* सामान्य प्रवर्गातील उमेदवार: १००० रुपये
* राखीव प्रवर्गातील उमेदवार : ९०० रुपये
अर्ज प्रक्रिया सुरू – १४ ऑक्टोबरपासून या नोकरीसाठी अर्जप्रक्रिया सुरु झाली आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – ३ नोव्हेंबर २०२४ रोजी रात्री 11:55 मी. पर्यंत
ऑनलाईन अर्ज लिंक – https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32780/87348/Index.html
📄 मूळ जाहिरात वाचा – https://shorturl.at/ZHRFs
महत्त्वाच्या बाबी
* राज्यातील २५ अंगणवाड्यांसाठी मुख्य पर्यवेक्षिका पदासाठी ही भरती करण्यात येणार आहे.
* अंगणवाडी सेविकांच्या कामांचे पर्यवेक्षण करणे हे मुख्य सेविकाचे काम आहे.
* या नोकरीबाबत सविस्तर माहिती अधिकृत वेबसाइटवर देण्यात आली आहे.