(जाकादेवी / वार्ताहर)
रत्नागिरी तालुका भारतीय बौद्ध महासभा गाव शाखा विल्ये व रत्नागिरी तालुका शाखेचे प्रचारक व पर्यटन विभागाचे सचिव, माजी श्रामणेर बौद्धाचार्य समता सैनिक दलाचे सैनिक आयु. आदेश तुकाराम कांबळे यांच्या मातोश्री आनंदीबाई तुकाराम कांबळे यांचे वयाच्या ९७ व्या वर्षी शुक्रवार दि.१० रोजी विल्ये येथील राहत्या घरी दुःखद निधन झाले.
दिवंगत आनंदीबाई कांबळे या अत्यंत कष्टाळू ,प्रेमळ आणि परोपकारी होत्या. त्यांनी आपल्या आयुष्यात अपार कष्ट करून आपल्या मुलांचे चांगले संगोपन केले. त्यांना धार्मिक व सामाजिक कार्याची आवड होती. बुद्ध फुले शाहू आंबेडकरी विचारधारेवर त्यांची मोठी श्रद्धा होती. त्यांच्या पश्चात मुली, मुलगे, सूना, जावई, नातवंडे असा मोठा परिवार आहे. त्यांच्या जाण्याने भारतीय बौद्ध महासभा विल्ये शाखा व रत्नागिरी तालुक्याच्या वतीने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यांचा पुण्यानुमोदन कार्यक्रम रविवार दि.१९ रोजी विल्ये येथे होणार आहे.