(रत्नागिरी / प्रतिनिधी)
महाराष्ट्र राज्याच्या अनुसूचित जाती – जमाती आयोगाचे उपाध्यक्ष तथा सदस्य ( सचिव दर्जा ) मा. अँड. धर्मपाल मेश्राम यांचे दिनांक 02 डिसेंबर 2024 रोजी रत्नागिरी दौऱ्यावर आले होते. यावेळी सामाजिक न्याय भवन कुवारबाव येथे आंबेडकरी समाजातील काही जेष्ठ नेत्यांसोबत मा. अँड. धर्मपाल मेश्राम यांचे अध्यक्षतेखाली आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती.
या बैठकीमध्ये जेष्ठ नेते मा. जे. पी. जाधव यांनी निवेदन सादर केले. रत्नागिरी जिल्ह्यामधील अनुसूचित जाती जमाती यांच्यावर होणारा अन्याय, निधीचा गैरवापर, जात पडताळणी प्रमाणपत्र मिळविताना येणाऱ्या अडचणी, विद्यार्थी यांचे वसतिगृह याचे बंद असलेले काम, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन कुवारबाव येथील अपूर्ण असलेली कामे, अनुसूचित जातीच्या रिक्त पदाचा शिल्लक अनुशेष, जिल्हा उधोग केंद्र व जिल्हा लीड बँका यांचेकडून होणारा अन्याय, पथदीप योजना, शिष्यवृत्ती योजना, अशा विविध विषयांबाबत आयोगाचे उपाध्यक्ष तथा सदस्य ॲड मेश्राम यांच्याबरोबर आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ नेत्यांसोबत चर्चा केली. या बैठकीला एल. व्ही. पवार, शरद कांबळे, सुधाकर कांबळे उपस्थित होते. ॲड मेश्राम यांनी सकारात्मक प्रतिसाद देऊन रत्नागिरी जिल्ह्यातील अनुसूचित जाती – जमाती व नवबौध्द यांच्यावर होणारा अन्याय दूर करणार असे सांगितले.
या बैठकीला आंबेडकरी चळवळीतील प्रतिनिधी जे. पी. जाधव, एल. व्ही. पवार, सुधाकर कांबळे, दिपक जाधव, बलवंत मोहिते, शिवराम कदम, शरद कांबळे, प्रकाश पांढरे सर, विजय जाधव, सुनील कांबळे, प्रमोद सावंत, सचिन जाधव, भार्गव जाधव, संतोष पडवणकर, केतन पवार आदी उपस्थित होते. अँड. धर्मपाल मेश्राम यांचा सकारात्मक प्रतिसाद पाहून उपस्थित मान्यवरांनी समाधान व्यक्त केले.