(रत्नागिरी)
जिल्ह्यातून ३२ हजारांपेक्षा जास्त शेतकरी फळपीक विमा योजनेत सहभागी झाले आहेत. मात्र, फळबाग नसतानाही विमा भरणाऱ्यांचा विमा कंपन्या व कृषी विभागाकडून शोध घेण्यात येत आहे. अद्याप एकही बोगस विमाधारक सापडलेला नाही. मात्र, गतवर्षी १९ जणांनी फळबाग नसताना विमा भरला होता.
गतवर्षीच्या फळपीक विमा योजनेत सहभागी झालेल्या आठ शेतकऱ्यांच्या नावावर फळबागच नव्हती. तर ११ शेतकऱ्यांच्या प्रस्तावात पिकाच्या नोंदीत विसंगती आढळली होती. त्याचप्रमाणे ३९ शेतकऱ्यांचे प्रत्यक्ष क्षेत्रावरील झाडांची संख्या कमी असल्याचे निदर्शनास आले होते. यावर्षी आतापर्यंत झालेल्या तपासणीत अनुचित प्रकार आढळला नसला तरी जिल्हाभरात कसून तपासणी सुरू आहे.
Also Read : वरंध घाट 30 मे पर्यंत सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी बंद
बोगस शेतकऱ्यांनी विमा योजनेसाठी भरलेली हप्त्याची रक्कम जप्त होऊ शकते. गतवर्षीची संख्या पाहता यावर्षीही शासनाच्या सूचनेनुसार तपासणी सुरू आहे. सात- बारावरील झाडांची संख्या व प्रत्यक्ष क्षेत्रावरील झाडांची संख्या, विमा योजनेचा लाभ घेतलेल्या लाभार्थ्यांच्या नावे फळबाग आहे का, प्रस्तावात काही विसंगती आहे का, याचा तपास सुरू आहे. फळबाग नसताना विमा भरणारे आढळले तर कारवाई करण्यात येणार आहे.
Follow us on Google News : https://news.google.com/s/CBIw9dzq7KQB?sceid=IN:en&sceid=IN:en&sceid=IN:en&r=0&oc=1