(चिपळूण)
राज्यातील हरितक्रांतीचे जनक आणि माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांनी कृषी क्षेत्राच्या विकासात दिलेल्या महत्त्वपूर्ण योगदाना च्या स्मरणार्थ एक जुलै रोजी कृषी दिन साजरा केला जातो. शरदचंद्रजी पवार कृषी महाविद्यालय खरवते दहिवली अंतर्गत कृषी कन्या विद्यार्थ्यांनीनी कृषी दिना निमित्त समारोप समारंभ आणि वृक्षारोपण मोहीम ह.भ.प.आ.बा सावंत माध्यमिक विद्यालय आणि ज्युनिअर कॉलेज नायशी येथे आयोजित करण्यात आला. यानिमित्त निबंध लेखन आयोजित करण्यात आल्या. यामध्ये पाचवी ते आठवी आणि नववी ते बारावी असे दोन गट करण्यात आले. कार्यक्रमात प्रारंभी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनीनी ‘कृषी व शेतकरी’ या विषयांवर आपले मनोगत व्यक्त केले.
कृषी क्षेत्राविषयी आवड निर्माण व्हावी या हेतूने कृषी दिन साजरा केला जात आहे असे मार्गदर्शन माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य श्री.आनंदा घाटगे सरांनी केले.यावेळी नायशी-कळंबुशी-वडेरू पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष मा.श्री.सुमित चव्हाण तसेच उपाध्यक्ष मा.श्री.सुरेशजी आग्रे व संस्थेचे संचालक श्री.राजेंद्र राक्षे,श्रीधर घाग आणि मा.श्री.सचिन चव्हाण (सरपंच मौजे कळंबुशी) उपस्थित होते तसेच नायशी गावाचे ग्रामसेवक श्री. योशेश सोनवणे आणि इतर सदस्य आणि अशा सेविका उपस्थित होते. या कार्यक्रमांमध्ये माध्यमिक विद्यालय तसेच ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी उस्फूर्तपणे सहभाग नोंदवला कार्यक्रमाची सुरुवात वृक्ष दिंडीने झाली. यावेळी विद्यार्थ्यांनी अनेक प्रकारच्या झाडांचे वृक्षारोपण केले.
कृषी विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनीनी कृषी दिनानिमित्त ह . भ..प.आ.बा. सावंत माध्यमिक विद्यालय येथे वृक्षारोपण केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कृषी विद्यार्थीनी कु.गौरवी चौलकर आणि कु.शिवानी कापसे यांनी केले. तसेच कु. प्रज्ञा शिंदे आणि कु.सेजल जाधव यांनी कृषी दिना निम्मत भाषण केले. यावेळी कृषी औद्योगिक कार्यक्रमाची माहिती आणि ग्रामीण कृषी जागरूकता या विषयावर कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शन शरदचंद्रजी पवार कृषी महाविद्या चे प्राध्यापक अंबरीश हत्तळी यांनी केले. निबंध लेखन यात प्रथम,द्वितीय,आणि तृतीय तसेच उत्तेजनार्थ विद्यार्थ्यांना बक्षीस देण्यात आले. तसेच संघाचे विद्यार्थीनीनी कु. श्रेया तरळ, कु. नक्षित्रा रायपूरे, कु. अयाना, कु. वर्षा, कु. भाविका धासाडे, कु.साक्षी देसाई, कु.आकांक्षा महांगरे यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले.