(रत्नागिरी)
रत्नागिरी जिल्ह्यात किरकोळ कारणामधून बेपत्ता होण्याचे प्रमाण वाढत आहे. अशीच एक घटना पावस परिसरातून समोर आली आहे. आईसह मुलगा बेपत्ता झाल्याची घटना घडली आहे. श्रद्धा श्रीकांत पटवर्धन (49) व संकेत श्रीकांत पटवर्धन (27, रा पावस रत्नागिरी) अशी बेपत्ता झालेल्यांची नावे आहेत. 17 मे 2024 पासून हे दोघेही राहत्या घरातून बेपत्ता झाले आहेत. याबाबत पूर्णगड पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिनांक 17 मे रोजी श्रद्धा पटवर्धन यांच्या घरी कौटुंबिक वाद निर्माण झाला होता. या रागातून श्रद्धा व त्यांचा मुलगा संकेत हे सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास अचानक घरातून कोठेतरी निघून गेले, अशी तक्रार श्रद्धा यांचे पती श्रीकांत यशवंत पटवर्धन यांनी पुर्णगड पोलिसांत दिली. त्यानुसार पोलिसांनी बेपत्ता झाल्याची नोंद केली आहे. श्रद्धा व संकेत यांच्याविषयी कुणाला काही माहिती असल्यास पुर्णगड पोलिसांशी संपर्क साधावा असे आवाहन सहाय्यक पोलीस फौजदार एस व्ही चव्हाण यांनी केले आहे.