(रत्नागिरी)
तालुक्यातील मालगुंड येथे प्रौढाने गेस्टरुमध्ये गळफास घेत आत्महत्या केली. ही घटना शनिवार २० जुलै रोजी सकाळी ११.३० वा. सुमारास उघडकीस आली. प्रकाश मारुती कुंभार (४४, मूळ रा. चिकोडी बेळगाव, कर्नाटक) असे गळफास घेत आत्महत्या केलेल्या प्रौढाचे नाव आहे.
प्रकाश हा खबर देणार यांच्याकडे चालक म्हणून नोकरीला होता. तो त्यांच्याच घरातील गेस्टरुममध्ये रहात होता. शनिवारी सकाळी ११.३० वा. सुमारास खबर देणार हे प्रकाश कुंभारच्या रुममध्ये गेले असता तो सिलिंग फॅनला बेडशिटच्या सहाय्याने गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. खाबर देणार यांनी त्याला तातडीने प्राथमिक आरोग्य केंद्र मालगुंड येथे दाखल केले असता तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला तपासून मृत घोषित केले. याप्रकरणी जयगड पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.