(गुहागर)
दि.२० आणि २१ डिसेंबर रोजी गुहागर तालुक्याच्या केंद्रीय क्रीडा स्पर्धा तवसाळ तांबडवाडी क्रिडा नगरी तवसाळ येथे संपन्न झाल्या. पडवे ऊर्दू येथील केंद्रीय क्रीडा स्पर्धेत सहभागी घेऊन आदर्श शाळा तवसाळ तांबडवाडी व तवसाळ बाबर वाडीच्या मुलांनी शाळेतील पटसंख्या कमी असुनसुद्धा दोन्ही शाळेतील मुलांनी एकसंघ आपला क्रिडा प्रकारात घवघवीत यश संपादित केले.
सांघिक क्रिडा प्रकारात खोखो- मोठा गट मुली- विजेता, कब्बडी- लहान गट मुलगे – विजेता, कब्बडी – लहान गट मुली- उपविजेता, कब्बडी – मोठा गट मुली- उपविजेता, खोखो – लहान गट मुली- उपविजेता, लंगडी लहान गट मुली- उपविजेता, लंगडी मोठा गट मुली- उपविजेता.
वयक्तीक क्रीडा प्रकार – उंच उडी मोठा गट मुलगे – प्रथम क्रमांक विजेता कु.आरंभ विनोद वाघे, उंच उडी लहान गट मुलगे – प्रथम क्रमांक, कु हर्ष दिपक निवाते आणि स्पर्श विजय नाचरे द्वितीय क्रमांक कु. हर्ष दिपक निवाते, धावणे – मुलगे ५० मिटर द्वितीय क्रमांक कु. हर्ष दिपक निवाते
आदर्श शाळा तवसाळ चे मुख्याध्यापक अंकुर मोहिते सर, साईनाथ पुजारा सर, संदिप भोये सर, ज्ञानेश्वर कोकाटे सर, शाळा नियोजन कमेटी तवसाळ तांबडवाडी व बाबरवाडी मुंबई मंडळ वतीने सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत पुढील स्पर्धेला शुभेच्छा देण्यात आल्या.