(राजापूर)
राजापूर तालुक्यातील मौजे पाचल-ताम्हाणे रस्त्यावर व्हेल माश्याची उलटीची तस्करी करणार असल्याची मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे सहायक वनरक्षक संरक्षक चिपळूण परीक्षेत्र वनाधिकारी रत्नागिरी व इतर अधिकारी/कर्मचारी यांच्यासमवेत सापळा लावून जागेवर मारुती सुझुकी कंपनीची बलेनो (क्र. MH.46CH3995)ची तपासणी करण्यात आली. यामध्ये आरोपी न.१ राजकुमार सुरेश शेलार (वय वर्ष ३३), २) आकाश राजेंद्र घाडगे (वय वर्ष २९), ३) रुपेश गणपत म्हात्रे (वय वर्ष ३९) यांनी व्हेल माश्याची उलटी सहित गाडी समोर गाडीची तपासणी करणारे कर्मचारी श्री. साबणे याना गाडीसमोरून उडवून गाडी घेउन पळून गेले.
सदरची गाडी आरोपी यांनी नर्ले मार्गे गगनबावडा-भोईबावडा दिशेने वेगाने निघुन गेली. व त्यामधील गाडीच्या बाहेर असणारा आरोपी राजकुमार सुरेश शेलार यांना वन विभाग अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतले. तद्नंतर गगनबावडा पोलीस स्टेशन यांना संपर्क केला असता, गगनबावडा पोलिस यानी गगनबावडा या नाकाबंदी करुन सदरील गाडी अडवून वरील आरोपी यांना ताब्यात घेतले, व त्याची वन अधिकारी रत्नागिरी (चिपळूण) यांना कल्पना देऊन आरोपी यांची पूर्ण चौकशीकरण्यात आली. यानंतर वैद्यकीय तपासणी करून पुढील चौकशीकामी परीक्षेत्र वन अधिकारी रत्नागिरी यांनी ताब्यात घेतले. सदर प्रकरणी वनपाल राजापूर यांनी वन्यजीव (संरक्षण) अधिनियम १९७२ नुसार प्र. गु.री.क्र. ०१/२०२४ दि.०४/०२/२४ अन्वये गुन्हा नोंद केला असून १६ फेब्रुवारी पर्यत न्यायालय कोठडी देण्यात आली आहे.
सदरची कार्यवाही मा. विभागिय अधिकारी रत्नागिरी (चिपळूण) श्री दीपक खाडे, व सहायक वनरक्षक रत्नागिरी ( चिपळूण) श्री वैभव बोराटे यांच्या मार्गदर्शनाखाली परिक्षेत्र वनाधिकारी रत्नागिरी श्री प्रकाश सुतार व त्यांचे अधिनस्थ कर्मचारी वनपाल श्री सदानंद घाडगे, श्री रामदास खोत, व श्री दिलीप आरेकर तसेच वनरक्षक श्री अरुण माळी, श्री सहयोग कराडे, श्री प्रभू साबणे, श्री विक्रम कुंभार, श्रीमती श्रवणी पवार, श्री शिदेश्वर गायकवाड, व वाहनचालक श्री अंकूश तांबट, रेस्क्यू टीम राजापूर चे श्री विजय न्हादये, श्री नितेश गुरव यांसमेवत पूर्ण केली. अश्या प्रकारच्या घटना घडल्यास किव्हा संकटांत सापडलेले वन्यप्राणी आढळल्यास याबाबत तात्काळ माहिती देण्याकरिता वनविभागाचा टोल फ्री क्र. १९२६ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन वनविभागामार्फ़त केले गेले आहे.