(रत्नागिरी)
दुचाकीवर मागे बसलेल्या आईच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी चालक मुलाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रोशन मनोज तळेकर असे त्याचे नाव असून, हा अपघात दि. ९ ऑक्टोबर २०२३ रोजी सायंकाळी चार वाजता सन्मित्रनगर येथे झाला होता.
या अपघातात मेघना मनोज तळेकर यांचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी हेड कॉन्स्टेबल प्रवीण पाटील यांनी तक्रार दिली होती. रोशन दुचाकीवरुन आई मेघना यांना बँकेच्या कामासाठी घेऊन जात होता. दुचाकीवरुन तोल गेल्याने त्याची आई रस्त्यावर पडून गंभीर जखमी झाली होती. त्यांच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असताना त्याच रात्री त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी १६ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.