(चिपळूण /वार्ताहर)
दापोली तालुक्यातील रहिवासी श्री.विजय नारायण पवार हे ग्रामपंचायत मुरुड, हर्णे दापोली येथे सन १९९० पासून ग्रामपंचायतीमध्ये शिपाई म्हणून पदावर कार्यरत होते. ते मे-१९९० पासून ग्रामपंचायतीची सर्व कामे नियमितपणे करीत असत. मुरूडचे सरपंच, ग्रामसेवक यांच्या मार्गदर्शनानुसार आणि आदेशाप्रमाणे मे २०२३ पर्यंत त्यांनी नियमितपणे नोकरी केली असून त्यांच्या कामांबाबत कोणतीही तोंडी अथवा लेखी स्वरूपात तक्रार नव्हती. असे असतानाही १ जुन २०२३ पासून ग्रामपंचायत मुरूड यांनी शिपाई पदावरून त्यांना कार्यमुक्त करण्यात आल्याचे पत्र देवून कामावरून कमी करण्यात केले होते.
याबाबत त्यांनी वारंवार विनवणी केली असतानाही कामावर घेण्यात आले नाही. त्यानंतर त्यांचे सहकारी श्री.उमेश यांनी चिपळूण येथील सामाजिक कार्यकर्ते व माहिती अधिकार निस्वार्थी चळवळ, महा.राज्य चे राज्य प्रमुख मार्गदर्शक व रत्नागिरी जिल्हाध्यक्ष श्री.योगेश पेढांबकर यांची भेट घ्या, तुम्ही कोर्टात जावू नका. ते कोर्ट मध्ये न जाताही न्याय मिळवून देतील, असे सांगितले. त्यानंतर श्री.विजय नारायण पवार व कुटुंबिय श्री. पेढांबकर यांना भेटण्यास आल्यावर सविस्तर घटना सांगण्यात आली. आपण तुम्हाला नक्की न्याय मिळवून देऊ, काळजी करू नका. यावेळी कसलीही अपेक्षा न करता श्री. योगेश पेढांबकर यांनी त्या कुटुंबाला आधार दिला.
दरम्यान, सातत्याने ग्रामपंचायत मुरुड, पंचायत समिती दापोली, व जिल्हा परिषद (ग्रा.पं)विभाग, रत्नागिरी यांच्याशी पाठपुरावा करत श्री.पेढांबकर यांच्या मागणीनुसार ८ महिन्यांमध्ये नवीन वर्षात १ जानेवारी रोजी श्री.विजय नारायण पवार यांना पुन्हा कामावर हजर होण्याचे पत्र देण्यात आले आहे. तसे आदेश पंचायत समिती दापोली येथील गट विकास अधिकारी यांनी दिले.
गेली अनेक वर्षे माहिती अधिकार निस्वार्थी चळवळीचे राज्य प्रमुख मार्गदर्शक व रत्नागिरी जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष श्री.योगेश पेढांबकर यांनी आजपर्यंत अनेक लोकांना कुटुंबांना न्याय मिळवून दिलेला आहे. तसेच खेड तालुक्यातील दहा ते बारा महिलांना संजय गांधी निराधार पेन्शन योजना तसेच राष्ट्रीय कुटुंब लाभ अपंग पेन्शन योजना अनेक शासकीय योजनेचे लाभ निस्वार्थ पद्धतीने मिळवून दिलेले आहे. वडिल श्री.एस.बी. पेढांबकर व काका जी.बी. पेढांबकर यांनी निर्माण केलेल्या सामाजिक कार्याची कास त्यांनीही धरली आहे. तळागाळातील सामान्य नागरिकांपासून वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत नैतिकतेचे संबंध, जिव्हाळ्याचे संबंध जपणारी व्यक्ती अशी आज संपूर्ण महाराष्ट्रात श्री. पेढांबकर यांची ओळख आहे. अशा विधायक कामाबद्दल त्यांचे विविध स्तरावरून कौतुक होत आहे.