( रत्नागिरी /प्रतिनिधी )
तालुक्यातील हातखंबा ग्रामपंचायत तर्फे गुरुवारी (ता. २७) आधार कार्ड काढण्यासाठी सलग दोन दिवस शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिराबाबत काही दिवसांपूर्वी हातखंबा ग्रामपंचायत सरपंच जितेंद्र तारवे यांनी गावातील लोकांना आवाहन केले होते.
या दोन दिवसीय शिबिरामद्ये पहिल्याच दिवशी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून अनेकांनी रांगेत उभे राहून नवीन आधार क्रमांकासाठी नोंदणी, अस्तित्वात असलेले आधार अपडेट करणे, आधार संदर्भातील बायोमेट्रिक माहिती अपडेट करून घेतली. दुसऱ्या दिवशी ही (दिनांक २८ जून २०२४ रोजी)सकाळी दहा ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत लाभ घेता येणार आहे.
या शिबिराच्या शुभारंभाला ग्रामपंचायतचे सर्व सदस्य, ग्रामसेवक आदी प्रतिष्ठित ग्रामस्थ उपस्थित होते. उद्या शुक्रवारी ही (ता. २८) हे शिबिर सुरू राहणार असल्याने या सेवेचा जास्तीत जास्त ग्रामस्थांनी लाभ घ्यावा, असे आवाहन सरपंच जितेंद्र तारवे यांनी केले आहे.