(दापोली)
दापोली तालुक्यातील हर्णे येथील खेम धरणामध्ये पोहायला गेलेल्या मित्रांपैकी कल्पेश बटावले या 19 वर्षीय युवकाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना रविवारी सायंकाळी घडली.
दापोली तालुक्यातील हर्णे येथील खेम धरण हे राखण देण्याकरिता व पोहण्यासाठी प्रसिद्ध आहे. येथे अनेक जण वर्षा सहलीकरिता येत असतात. दापोली तालुक्यातील सातांबा येथील चौघेजण खेम धरणामध्ये रविवारी सायंकाळी पोहण्याकरिता गेलेले होते. त्यांना पाण्याचा अंदाज न आल्याने चौघेजण बुडू लागले. मात्र तेथे उपस्थित असणाऱ्या ग्रामस्थांकडून यापैकी तिघांना वाचवण्यात यश आले. मात्र कल्पेश बटावले याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. त्याचा मृतदेह शोधण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.